शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याकडून शाळेसाठी ३० हजारांची मदत

By admin | Updated: October 19, 2015 01:31 IST

येथून जवळच असलेल्या चालबर्डी (रै.) येथील सुमित्रा जोगी व गोसाई जोगी या वृध्द शेतकरी दाम्पत्याने शाळेसाठी ३० हजार रूपयांची रक्कम

जोगी दाम्पत्याचे दातृत्व : विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था होणारघोडपेठ : येथून जवळच असलेल्या चालबर्डी (रै.) येथील सुमित्रा जोगी व गोसाई जोगी या वृध्द शेतकरी दाम्पत्याने शाळेसाठी ३० हजार रूपयांची रक्कम देणगीच्या स्वरूपात दिल्याने शाळा व्यवस्थापनाकडून गुरूवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.चालबर्डी (रै.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला आदर्श व अद्ययावत करण्याचा संकल्प गांधीजयंती निमीत्त आयोजित बालक-पालक मेळाव्याप्रसंगी करण्यात आला होता. त्याद्वारे शाळेमध्ये ई-लर्निंग शिक्षणप्रणाली व विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून जलशुद्धीकरण यंत्र लावण्याची कल्पना सुचविण्यात आली. यासाठी भक्कम निधीची आवश्यकता होती. त्यानुसार भद्रावती येथील रोटरी क्लब तसेच लोकसहभागातून निधी उभारण्याचे ठरविण्यात आले.दरम्यान, गावातील गोसाई जनार्धन जोगी व सुमित्रा जोगी या वृद्ध शेतकरी दाम्पत्याने या समाजकायार्साठी तीस हजार रूपयांची रोख रक्कम देणगी म्हणून शाळेतील व्यवस्थापनाच्या सुपुर्द केली. याप्रसंगी शाळेतर्फे जोगी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. गोसाई जोगी यांना सुमित्रा जोगी यांच्या रूपाने गृहदक्ष पत्नी लाभल्या. त्यांनी आपल्या सर्व मुलांना संस्काराचे धडे देवून उच्चशिक्षण दिले. आज त्यांची मुले सरकारी नोकरीवर आहेत. सोबतच आपल्या मातापित्यांचा व्यवस्थित सांभाळही करीत आहेत. सुमित्रा जोगी यांच्या पुढाकाराने शाळेला देणगी देण्याचा निर्णय घेतल्याचे जोगी कुटूंबियांनी सांगितले.येत्या काही महिन्यांत शाळेच्या नावाने एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट करून त्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशांवर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला उपयोगी पडतील, अशा वस्तू भेट स्वरूपात देण्याचा मानस गोसाई जोगी यांचे पुत्र कोमेश्वर जोगी यांनी सत्कारप्रसंगी बोलून दाखविला. (वार्ताहर)