शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यामधील ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

आजघडीला जिल्ह्यातील एकूण १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्ण म्हणजेच ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आहेत. या तालुक्यापाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता हॉटस्पाट ठरू लागला आहे. या तालुक्यात २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाले.

ठळक मुद्देरुग्णाचा आलेख वाढताच : ब्रह्मपुरी तालुका ठरत आहे हॉटस्पॉट, ग्रामीण भागातही वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तोदेखील चंद्रपूरचाच. त्यानंतर चंद्रपूर तालुक्यात रुग्णाचा आलेख वाढतच राहिला. आजघडीला जिल्ह्यातील एकूण १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्ण म्हणजेच ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आहेत. या तालुक्यापाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता हॉटस्पाट ठरू लागला आहे. या तालुक्यात २१ रुग्ण आढळले आहेत.कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाले. सहाजिकच चंद्रपूर जिल्हाही लॉकडाऊन झाला. मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्तच राहिला. मात्र त्यानंतर २ मे रोजी चंद्रपुरातील कृष्णनगर परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जिल्ह्यात विशेषत चंद्रपुरात खळबळ उडाली. याच कालावधीत मजुरांचे जिल्ह्यात परत येणे सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येणे सुरू झाले. असे असले तरी चंद्रपूर तालुक्यातील रुग्णांचा आलेख सातत्याने वाढतच राहिला. चंद्रपूर शहरासह तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर, उर्जाग्राम, वरवट, आरवट, घुग्घुस या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारपर्यंत चंद्रपूर तालुक्यात एकूण ३७ रुग्णांची नोंद आहे. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुका रुग्णांबाबत संवेदनशिल ठरला आहे. या तालुक्यात सोमवारपर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १२३ रुग्णांपैकी ३७ चंद्रपूर तालुका, २१ ब्रह्मपुरी तालुका तर उर्वरित ६५ रुग्ण इतर ग्रामीण भागातील आहेत.सावली, जिवती कोरोनामुक्त तालुकेजिल्ह्यातील सावली, जिवती हे या दोन तालुक्यातील एकाही गावात अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. या तालुक्यातदेखील बाहेर राज्यातून व जिल्ह्यात अनेक कामगारवर्ग परत आला आहे. मात्र त्यातील कुणालाही आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे हे तालुके सध्यातरी कोरोनामुक्त आहेत.सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संशयितांचे व क्वारंटाईन असणाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ७६२ जणांचे अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बाधितांचा आलेख आणखी वाढतच जाणार आहे.दोन नवे रुग्णजिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. नव्या दोन बाधितांमध्ये चंद्रपुरातील संस्थात्मक अलगीकरणात असणाºया भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला आली होती. दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील २१ वर्षीय हा तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या