शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

26 चा ओबीसी मोर्चा : दीक्षाभूमी ते गांधी चौक मार्गे क्लबग्राऊंडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज दीक्षाभूमी चंद्रपूर येथून ६ -६ च्या रांगेत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा रामनगर, जटपुरा गेट ते जयंत टाॅकीज- गांधी चौकातून डावीकडे वळण घेत सराफा लाईन मार्गे कस्तुरबा चौक येईल. तेथून डावीकडे वळण घेत  जटपुरा गेट मार्गे  प्रियदर्शीनी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर जातील. यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देओबीसी म्हणूनच व्हावे लागणार सहभागी : समन्वय समितीने केले स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसींचे हक्क,  जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी ओबीसींचा चंद्रपुरात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विविध समित्या तसेच प्रत्येकांना जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकत्यांनी तसेच इतर पदाधिकाऱ्यांना आपले पद बाजूला सारून केवळ ओबीसी म्हणूनच सहभागी व्हावे लागणार आहे. यासंदर्भात समन्वय समितीने तशा स्पष्ट सूचना केल्या आहे. त्यामुळे राजकीय  किंवा इतर इच्छाशक्ती ठेवून मोर्चात सहभागी होणाऱ्यांवर  चाप बसणार आहे.मोर्चानंतर ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी समन्वय समितीचे  ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. दत्ता हजारे, बळीराज धोटे, डाॅ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदखल, प्रा. विजय मुसळे, ॲड. प्रशांत सोनुले आदींनी केले आहे.५०० व्हाॅलेंटिअर्स तैनातमोर्चामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ५०० व्हाॅलेंटिअर्सची चमू राहणार आहे. त्यांना मोर्चातील शिस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मास्क, सोशल डिस्टन्स, रांगेत चालण्यासाठी वेळोवेळी मोर्चेकऱ्यांना सांगण्याची जबाबदारी  त्यांना देण्यात आली आहे. मोर्चादरम्यान, कचरा होऊ न देता स्वच्छता पाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.असा असेल मार्गडाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज दीक्षाभूमी चंद्रपूर येथून ६ -६ च्या रांगेत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा रामनगर, जटपुरा गेट ते जयंत टाॅकीज- गांधी चौकातून डावीकडे वळण घेत सराफा लाईन मार्गे कस्तुरबा चौक येईल. तेथून डावीकडे वळण घेत  जटपुरा गेट मार्गे  प्रियदर्शीनी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर जातील. यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे.

वाहन पार्किंगची अशी आहे व्यवस्थामूल व दुर्गापूर रोडकडील वाहने - लाॅ काॅलेज समोरील व विद्याविहार काॅन्व्हेंट मागील प्रशस्त मैदानात ठेवण्यात येईल. बल्लारपूर बायपास मार्गे येणारी वाहने - लाॅ काॅलेज व विद्याविहार काॅन्व्हेंट मागील मैदानातबल्लारपूर रोड, महाकाली मंदिराकडून येणारी वाहने-कोहिनूर ग्राऊंड,महाकाली मंदिर परिसरातील मनपा मैदान,पठाणपुरा रोडमार्गे येणारी वाहने -कोहिनूर ग्राऊंडनागपूर रोड मार्गे येणारी वाहने विद्या निकेतन शाळा, गौरव सेलिब्रेशन लाॅन, लोकमान्य टिळक विद्यालय स्टेडियम जवळ, सेंट मायकेल स्कूल मैदान, चांदा पब्लिक स्कूल, इंदिरा गार्डन स्कूल, सिंधी काॅलनी, दांडिया मैदान, पिक प्लॅनेट बाजूचे मैदान येथे थांबविण्यात येणार आहे. 

टॅग्स :Morchaमोर्चाOBCअन्य मागासवर्गीय जाती