२०३ महिलांना मिळणार ग्रा.पं. सदस्य पदाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:38+5:30

नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायती नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.

203 women to get Gram Panchayat Membership Opportunity | २०३ महिलांना मिळणार ग्रा.पं. सदस्य पदाची संधी

२०३ महिलांना मिळणार ग्रा.पं. सदस्य पदाची संधी

ठळक मुद्देनागभीड तालुका : ४३ ग्रामपंचायतींची जुलै अखेरीस निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : जुलै महिन्याच्या अखेरीस नागभीड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यासाठी प्रभागनिहाय सदस्यांचे आरक्षण काढण्यात आल. यात २०३ महिलांना ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून संधी मिळणार आहे.
नागभीड तालुक्यात पूर्वी ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायती नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्याने तालुक्यात आता ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
पूर्वतयारी म्हणून प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्वच ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे प्रभागनिहाय आरक्षण पाडले आहेत आणि ते जाहीरही करण्यात आले आहेत. या ४३ ग्रामपंचायतीसाठी एकूण ३६३ सदस्यांची निवड होणार आहे. यात २०३ महिला आहेत. विविध प्रवर्गाचा विचार करता अनु.जाती प्रवर्गातून १९ महिलांची निवड करण्यात येणार आहे. अनु.जमाती प्रवर्गातून ४१ , ना.मा.प्र.प्रवर्गातून ४७ तर सर्वसाधारण प्रवर्गातून ९६ महिलांची सदस्य म्हणून निवड होईल.
यापूर्वी नागभीड तालुक्यातील १३ ग्राम पंचायतींच्या सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली होती. मधल्या काळात राज्य सरकारने ही पद्धत बंद करून जुन्याच पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून सरपंच निवडीचा कायदा केल्याने या ४३ ग्राम पंचायतींच्या सरपंचांची निवड सदस्यांमधून होणार आहे. त्यामुळे सरपंच निवडीची रंगत अधिक वाढणार आहे.

गावांचा कारभार महिलांच्या हाती
४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून यातील अनेक गावांमध्ये महिलांच्या हाती गावांचा कारभार राहणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण अद्याप तरी जाहीर व्हायचे आहे. त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच गावांतील चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: 203 women to get Gram Panchayat Membership Opportunity