शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

20 कर्मचारी अन्‌ 15 ट्रॅप कॅमेऱ्यांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:00 IST

बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.

ठळक मुद्देलागोपाठ वाघाच्या हल्ल्याने वनविभाग सतर्क : नागरिकांमध्ये दहशत, त्वरित बंदोबस्ताची मागणी

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : मंगळवार आणि बुधवारी धामणगाव चक आणि गिरगाव येथे घडलेल्या वाघाच्या घटनांनी परिसर चांगलाच दहशतीत आला आहे. वन विभागही चांगलाच सतर्क झाला असून या दोन्ही घटनास्थळांच्या परिसरात गस्तीसाठी २० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी १५ कॅमेरे लावण्यात आहेत.  बुधवारी वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश पुंडलिक गुरूनुले रा. गिरगाव (५०) असे असून मंगळवारच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव विक्राबाई पांडुरंग खोब्रागडे (६४) असे आहे. वाघाकडून मानवावावर झालेल्या या हल्ल्याच्या दोन्ही घटना लागोपाठ आणि पाच ते सहा किमी परिसरातच घडल्याने परिसरातील गावांमधील नागरिक चांगलेच दहशतीत आले आहेत.ज्या परिसरात या घटना घडल्या तो परिसर जंगलव्याप्त आहे. या परिसरातील गावांची म्हणा किंवा नागरिकांची उपजीविकेची काही साधने जंगलावरच अवलंबून आहेत. रोज सकाळी उठल्याबरोबर या गावांचा जंगलाशीच संबंध येतो. सध्या तर मोहफुलाचा मोसम आहे. काही दिवसांनी तेंदूपत्ता संकलन सुरू होईल. गिरगाव हे तर जिल्ह्यातील केरसुणी निर्मितीचे मोठे केंद्र आहे. या गावातील अनेक कुटुंब वर्षातील सहा महिने याच कामात व्यस्त असतात. या व अन्य विविध कामांसाठी या जंगलव्याप्त गावातील नागरिकांना जंगलात जावेच लागते. नव्हे जंगलात जाणे हा त्यांचा क्रम आहे. विक्राबाई खोब्रागडे असो, नाही तर सुरेश गुरूनुले याच कामासाठी जंगलात गेले होते; पण वाघाने डाव साधला आणि एका महिलेस ठार केले तर दुसऱ्या एका व्यक्तीस गंभीर जखमी केले.

गावकऱ्यांचा जंगलाशी संबंधवाघाने हल्ला केला म्हणून नागरिकांचे जंगलाशी असलेले संबंध संपणार नाहीत. जंगलव्याप्त गावातील नागरिक आणि जंगलजन्य उपज हे अविभाज्य समीकरण आहे. पूर्ण नाही पण या गावांची निम्मी अर्थव्यवस्था याच समीकरणांवर अवलंबून आहे. म्हणूनच या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करा,  अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागही सतर्क झाला आहे. धामणगाव चक आणि गिरगाव जंगल परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी २० वन कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच १५ कॅमेरे लावण्यात आले आहेत.

पिंजरा नाहीवाघाच्या हालचाली टिपण्यासाठी फौजफाटा लावण्यात आला असला तरी या हल्लेखोर वाघास पकडण्यासाठी एकही पिंजरा लावण्यात आला नाही. या वाघाला आता मानवी रक्ताची चटक लागली असून त्याच्याकडून आणखी असे हल्ले होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे टाळण्यासाठी या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. ‘तो’ एकच वाघ? गिरगाव आणि धामणगाव चक या दोन घटनास्थळातील अंतर चार ते पाच किमीचे असून हल्लेखोर वाघ एकच असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग