चंद्रपुरात सुगंधित तंबाखूसह २ लाखांचे प्रतिबंधित पानमटेरियल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:59+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २१ मार्च ते १८ मे पर्यंत १५२ आस्थापनांची तपासणी केली असून १६ जणांकडून प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ४१ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आल्याचे सहआयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले. तर चोरटी वाहतुक करणारे ६ वाहनेही ताब्यात घेतल्याचे सांगितले. यामध्ये सुगंधित तंबाखूशी संबंधित १६ कारवायांचा समावेश आहे.

2 lakh banned panmaterials including aromatic tobacco seized in Chandrapur | चंद्रपुरात सुगंधित तंबाखूसह २ लाखांचे प्रतिबंधित पानमटेरियल जप्त

चंद्रपुरात सुगंधित तंबाखूसह २ लाखांचे प्रतिबंधित पानमटेरियल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतचा दणका : अन्न व औषध प्रशासन विभाग अ‍ॅक्शनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘लोकमत’ने सुगंधित तंबाखूच्या काळाबाजारीवर सुरू केलेल्या वृत्त मालिकेने अखेर अन्न व औषध प्रशासन विभाग खळबडून जागा झाला आहे. या विभागाने मंगळवारी चंद्रपूरातील गोल बाजारात अससेल्या आनंद किराणा दुकानावर धाड घालून सुमारे २ लाखांचा सुगंधित तंबाखू व प्रतिबंध असलेले पान मटेरियल जप्त केले आहे. या कारवाईने अद्यापही सुगंधित तंबाखूचे साठे संपुष्टात आले नसून छुप्या मार्गाने ही काळाबाजारी सुरूच असल्याचे दिसून येते.
अन्न व औषध प्रशासन विभागाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २१ मार्च ते १८ मे पर्यंत १५२ आस्थापनांची तपासणी केली असून १६ जणांकडून प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ४१ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आल्याचे सहआयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले. तर चोरटी वाहतुक करणारे ६ वाहनेही ताब्यात घेतल्याचे सांगितले. यामध्ये सुगंधित तंबाखूशी संबंधित १६ कारवायांचा समावेश आहे. अन्न विश्लेषण अहवाल प्राप्त होताच त्यांच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. आता या कारवाया कधीपर्यंत चालते याकडे जनतेचे लक्ष आहेत.

कारवायानंतर सुगंधित तंबाखूचे डोके पुन्हा वर
अन्न व औषध प्रशासन विभाग एकीकडे कारवाया केल्याचे सांगत असल चंद्रपूर जिल्ह्यात सुंगधित तंबाखूच्या काळाबाजारीवर अंकुश लावण्यात या विभागाला अद्याप यस आले नाही. जिल्ह्यातील अनेक भागात सुगंधित तंबाखूची साठेबाजी करून ठेवली असल्याचे या व्यवसायातील सूत्रांचे म्हणणे आहे. हे साठेबाज सुगंधित तंबाखूची मनमानी भावाने विक्री करून किरकोळ खर्रा विक्रेत्यांची मोठी लुट करीत आहे. इतकेच नव्हे, तर नामांकित तंबाखूच्या डब्यात डुप्लिकेट तंबाखू भरून तो ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. हे थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ कारवायानंतर सुगंधित तंबाखूने डोके वर काढू नये, यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. आम्ही मारल्यासारखे करतो तुम्ही रडल्यासारखे करा, असा हा प्रकार जिल्ह्यात जनतेच्या डोळ्यादेखत सुरू आहे.

Web Title: 2 lakh banned panmaterials including aromatic tobacco seized in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.