शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाखांचे सौर ऊर्जा संयंत्र कचऱ्यात

By admin | Updated: April 28, 2015 01:23 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार लक्षावधी रुपयांचा खर्च करीत असले तरी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे

शासकीय आश्रमशाळेतील प्रकार : विहिरीत साचला कचऱ्याचा ढिगशंकर मडावी  देवाडा (राजुरा)आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार लक्षावधी रुपयांचा खर्च करीत असले तरी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे चांगल्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ होतो, याची प्रचिती देवाडा येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत येत आहे. नियोजन करून हा प्रकल्प उभारण्यात न आल्याने लाखो रुपये खर्चूनही हा प्रकल्प निरर्थक ठरला आहे. राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय पोस्ट बेसीक आदिवासी आश्रमशाळेत शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सोईसाठी १८ लाख रुपये खर्च करून सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र हा प्रकल्प सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने सदर आश्रमशाळेला भेट दिली असता, हा गंभीर प्रकार उजेडात आला. यासोबतच या आश्रमशाळेत अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधीक्षक आणि मुख्याध्यापकांचे अज्ञानदेवाडा येथील आश्रमशाळेत मुला-मुलींना राहण्याची व्यवस्था आहे. त्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज असते. यासह विजेसंदर्भातील विविध गरजाही या प्रकल्पातून भागू शकतात, ही बाब लक्षात घेऊनच शासनाने या आश्रमशाळेत सौरऊर्जा प्रकल्प उभारला. हा प्रकल्प दोन भागात उभा आहे. मात्र या प्रकल्पाची अतिशय दुरवस्था झाली असून तो सध्या बंद अवस्थेत आहे. मुळातच वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापकाच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला. कर्मचारी मद्याच्या आहारीयेथील जबाबदार कर्मचारी मद्याच्या आहारी गेले असून दारूच्या नशेत हे कर्मचारी विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी यापूर्वी विद्यार्थिनी केल्यानंतर पंचायत समिती सदस्य व सरपंचांनी वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्या तक्रारीची साधी चौकशीही करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखविले नाही.आश्रमशाळेतील विहिरीचीही तीच अवस्थालाखो रुपये खर्च करून आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या विहिरीचीही तिच अवस्था झाली आहे. या विहिरीभोवती कचऱ्याचे ढिगारे उभे आहे. या विहिरीतील पाण्याचा वापरदेखील केला जात नसल्याचे वास्तव आहे. याप्रकाराकडे मात्र वसतिगृह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर विहिरीसभोवतालचा कचरा स्वच्छ केल्यास या विहिरीतील पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.लाखो रुपयांचा निधी जातो कुठे? शासकीय वसतीगृहाच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र या निधीचा उपयोग नेमका कशासाठी करण्यात येतो, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. या निधीची चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.