शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत १८ लाखांची दारू जप्त

By admin | Updated: April 18, 2015 01:09 IST

१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतरही दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ....

चंद्रपूर : १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. मात्र त्यानंतरही दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दारू तस्करांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी तब्बल १८ लाख २२ हजार २९ रुपयांची दारू जप्त केली. त्यात देशी-विदेशी दारूचा समावेश आहे. महिलांच्या आंदोलनाचा सन्मान करीत शासनाने जिल्ह्यात दारूबंदी केली. त्यामुळे बंदीच्या या जिल्ह्यात अवैध दारू विक्रीची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.राजीव जैन यांनी फिल्डींग लावली. प्रत्येक रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात आले. मात्र या तपासणी नाक्यांनाही न जुमानता काहींनी शहरात दारू आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. गेल्या १५ दिवसांमध्ये पोलिसांनी दारूसाठे हुडकून काढत तस्करांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईमुळे दारू तस्कर हादरून गेले आहेत. तपासणी नाक्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे. चंद्रपूरलगतच्या गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात दारूबंदी असली तर दोनही जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून तसेच यवतमाळ जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने दारूचा शिरकाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. (प्रतिनिधी)