शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

१७४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देआरटीई अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश : १५ एप्रिलनंतरच होणार पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्राुदर्भाव रोखण्यासाठी देशभरात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आरटीईची सोडतीमध्ये निवडलेल्या १७४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश अडला आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि पडताळणी या संदर्भातील निर्णय हा १५ एप्रिलनंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्यातील १८०७ जागांसाठी चार हजार ४१४ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत आॅनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी करण्यात आली. यात १७४२ जणांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी त्यांना ३१ मार्च ही मुदत देण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे १५ एप्रिल नंतरच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचे व्हेरीफिकेशन होणार आहे.नामांकित शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची लॉटरी आॅनलाईन पध्दतीने काढण्यात आली. ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर मॅसेज गेलेत. सोबत प्रतीक्षा यादी देखील दिली आहे. पालकांना प्रवेशांसाठी ३१ मार्च ही अंतिम यादी देण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकीया बंद असल्याने जिल्ह्यातील सुमारे एक हजार ७४२ विद्यार्थ्यांच्या प्रवेश रखडला आहे.कागदपत्रांचे व्हेरीफिकेशन रखडलेज्यांची लॉटरीमधून निवड झाली आहे. त्यांनी संबधीत शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी लगेच करायची असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आरटीईच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ मार्चनंतर होईल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनाचे देशात कहर माजविल्यामुळे १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरच ही शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा