शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांतील 15 टक्के शुल्क कपात आदेशच आला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

कोरोनामुळे गतवर्षी मुलांनी शिक्षणाचे ऑनलाईन धडे घेतले. ही शैक्षणिक पद्धती परिपूर्ण नाही. मात्र शाळांनी पालकांकडून १०० टक्के फी घेतली. यंदाही हाच प्रकार घडणार असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे शाळा चालविण्यासाठी खर्च लागतो, असा दावा खासगी शिक्षण संस्थाचालक करीत आहेत. यंदा कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावली. काही पालकांनी १०० टक्के शुल्काविरूद्ध न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यंदाच्या सत्रात १५ टक्के शुल्क कपात करा, असा आदेश दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक पालकांचा रोजगार बुडाला. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्यांना पाल्यांचे १०० टक्के शुल्क भरणे शक्य नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार शुल्कात १५ टक्के कपात करण्याच्या सूचना राज्य शासनाला दिल्या. मात्र, शिक्षण विभागाकडून हा आदेश शाळांपर्यंत पोहोचलाच नाही, असे शाळांचे म्हणणे आहे. परिणामी, खासगी शाळांची १५ टक्के शुल्क कपात कागदावरच राहिली तर काही शाळांनी शुल्क भरण्याचा तगादा लावल्याचा आरोप पालकांनी केला आहे.कोरोनामुळे गतवर्षी मुलांनी शिक्षणाचे ऑनलाईन धडे घेतले. ही शैक्षणिक पद्धती परिपूर्ण नाही. मात्र शाळांनी पालकांकडून १०० टक्के फी घेतली. यंदाही हाच प्रकार घडणार असल्याने पालकांमध्ये नाराजी आहे तर दुसरीकडे शाळा चालविण्यासाठी खर्च लागतो, असा दावा खासगी शिक्षण संस्थाचालक करीत आहेत. यंदा कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावली. काही पालकांनी १०० टक्के शुल्काविरूद्ध न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यंदाच्या सत्रात १५ टक्के शुल्क कपात करा, असा आदेश दिला. राज्य शिक्षण विभागाने सर्व शाळांना सूचना देऊन खासगी शाळांची १५ टक्के शुल्क कपात लागू करणे आवश्यक होते. मात्र, शाळांपर्यंत हा आदेश पोहोचलाच नाही. त्यामुळे अंमलबजावणी कागदावरच राहण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.  जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आता चाचण्या घेतल्या जात आहेत.

पालकांनी भरला   पहिला इन्स्टॉलमेंट ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील बहुतांश विनाअनुदानित शाळांनी शुल्काचा पहिला इन्सटॉलमेंट वसूल केला. अनेक शाळांच्या आता लेखी चाचण्या सुरू आहेत. चाचणी झाल्यानंतर पालक मुलांचे पेपर शाळेत सादर करतील. मात्र, शुल्क भरले तरच पालकांना पाल्यांचे तपासलेले पेपर पाहता येईल, अशी शक्यता पालकांनी वर्तविली आहे.

संस्थाचालक म्हणतात...मुलांच्या शुल्कामधूनच शाळेचा सर्व खर्च करावा लागतो. शाळा बंद असली तरी शिक्षक ऑनलाईन शिक्षण देत आहेत. शासनाकडून कोणतेही शाळांना अनुदान मिळत नाही. मुलांच्या शुल्कावरच शाळा चालविले जाते. न्यायालयाच्या निर्णयानुसार इंडियन इंग्लिश स्कूल असोसिएशनशी जुळलेल्या शाळांनी शुल्कात १५ टक्के सवलत दिली आहे.-दिलीप झाडे, अध्यक्ष इंडियन इंग्लिश स्कूल असोसिएशन, विदर्भ

पालकांच्या तक्रारीच आल्या नाहीजि. प. शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना विचारले असता म्हणाले, राज्य शासनाकडून आदेश आला नाही. शुल्काबाबत एकाही पालकाने लेखी तक्रार केली नाही. तक्रार आल्यास पालकांना निश्चित न्याय देऊ शासनाकडून आदेश मिळताच शाळांना कळविण्यात येईल.

 

टॅग्स :Schoolशाळा