शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एका रॉयल्टीवर १० ट्रॅक्टर रेती वाहतूक

By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST

तालुक्यात रेतीघाट सुरू करण्यात आले आहेत. या रेतीघाटावरुन शासनाने ठरवून दिलेल्या अटींना बगल देवून रोज पोकलॅडवरुन शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे.

चिमूर : तालुक्यात रेतीघाट सुरू करण्यात आले आहेत. या रेतीघाटावरुन शासनाने ठरवून दिलेल्या अटींना बगल देवून रोज पोकलॅडवरुन शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे महसूल विभागाला दररोज लाखो रूपयांचा फटका बसत असून अवैध उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख गजानन बुटके यांनी पत्रकार परिषदेत केली. शासनाने रेतीच्या अवैध उपसावर आळा बसावा याकरीता अनेक नियम लावले व उपसा पारदर्शक कसे होईल याकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, चिमूर तालुक्यातील शेडगाव गावाजवळील रेती घाटावरुन शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त ब्रॉस रेतीचा उपसा करण्यात येत आहे. तसा रेतीचा उपसा जमिनीच्या तीन फुट पर्यंत करायला पाहिजे. मात्र जमिनीच्या खोलवर दहा फुटापर्यंत रेतीचा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने ठरवून दिलेल्या रॉयल्टी किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारत असल्याने ग्राहकांची लुट होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना बांधकाम करण्याकरीता आर्थिक फटका बसत आहे. रेतीचा उपसा करण्यासाठी शासनाने जेसीपी पोकलॅडवर बंदी केली आहे. मात्र चिमूर तालुक्यातील शेडेगाव घाटावर चक्क पोकलॅडद्वारे रेतीचा उपसा करण्यात येत आहे, असे बुटके यांनी यावेळी सांगितले. लिलाव झालेल्या घाटाचे सीमांकन महसूल विभागाने द्यायला पाहिजे. मात्र या घाटावर रेती उपसा करण्याची सीमा नसल्याने जागेव्यतिरिक्त रेती उपसा रेती घाटधारकाकडून होत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचा फटका बसत आहे. रेतीघाटांवर सर्रास नियमांचे उल्लंघन होत असून रेती घाटांची चौकशी करुन दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गजानन बुटके यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)