शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

JOB Alert : गुड न्यूज! पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 1110 पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 3:39 PM

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

नवी दिल्ली - पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (PGCIL Apprentice Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. तब्बल 1110 पदांवर अप्रेंटिस भरती निघाली आहे. अधिकृत माहितीनुसार, पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्टसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार powergrid.in वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज जमा करण्यास सुरुवात - 21 जुलै 2021

ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट

पात्रता

- आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिकलसाठी उमदेवार इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

- डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

- ग्रॅज्युएट अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएसी इंजिनिअरींग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्युटर सायन्समध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

- HR एक्झ्युकेटीव्हसाठी मानव संसाधनातील एमबीए, एमएसडब्ल्यू, पर्सनल मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम.

स्टायपेंड

आयटीआय अप्रेंटिस: 11 हजार

डिप्लोमा अप्रेंटिस: 12 हजार

ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 15 हजार

HR एक्झ्युकेटीव्ह : 15 हजार

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड त्यांच्या संबंधित ट्रेडमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. त्यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत