नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलीस दलात सामील होण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सीआरपीएफने २०२६ सालासाठी ९१९५ कॉन्स्टेबल (टेक्नेशियन आणि ट्रेडसमन) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज प्रक्रिया आजपासून (२० एप्रिल २०२६) सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
या पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. टेक्नेशियन पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव किंवा आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम सीआरपीएफच्या अधिकृत संकेतस्थळावर (rect.crpf.gov.in) जा.- 'Recruitment' टॅबवर क्लिक करा आणि कॉन्स्टेबल भरती २०२६ ची लिंक निवडा.- वैयक्तिक माहिती भरून नोंदणी (Registration) करा.- त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.- परीक्षा शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
निवड प्रक्रियेचा टप्पा
प्रथम संगणकावर आधारित लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
Web Summary : CRPF invites applications for 9,195 Constable posts (Technician & Tradesman). Apply online from April 20 to May 19, 2026. Tenth pass is required. Selection includes written exam, physical test, and medical examination. Visit rect.crpf.gov.in for details.
Web Summary : सीआरपीएफ ने 9,195 कांस्टेबल (टेक्नीशियन और ट्रेड्समैन) पदों के लिए आवेदन आमंत्रित किए हैं। 20 अप्रैल से 19 मई 2026 तक ऑनलाइन आवेदन करें। दसवीं पास आवश्यक है। चयन में लिखित परीक्षा, शारीरिक परीक्षा और चिकित्सा जांच शामिल है। विवरण के लिए rect.crpf.gov.in पर जाएं।