सिनगाव जहागीर येथील युवकाचा खून

By Admin | Updated: January 1, 2017 01:37 IST2017-01-01T01:37:05+5:302017-01-01T01:37:05+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील घटना.

The youth murdered at Sinngaon Jahgir | सिनगाव जहागीर येथील युवकाचा खून

सिनगाव जहागीर येथील युवकाचा खून

सिंदखेडराजा, दि. ३१- देऊळगावराजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील शुभम गजानन सानप (वय १६) या युवकाचा मुतदेह सिंदखेडराजा येथील कृउबासच्या काही अंतरावर आसोला जहागीर वन विभागाच्या जंगलामध्ये ३0 डिसेंबर रोजी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिनगाव जहागीर येथील शुभम सानप हा गावातील विद्यालयात ११ वीचे शिक्षण घेत होता. २६ डिसेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. तर ३0 डिसेबर रोजी सकाळी आसोला जहागीर येथील वन विभागाच्या जंगलामध्ये युवकाचे प्रेत आढळून आल्याची माहिती मिळताच ठाणेदार जाधव यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
यावेळी सदर युवकाचा गळा आवळून खून झाल्याचे प्रथमदर्शनी आढळले. त्यानुसार सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात अरोपींविरुद्ध ३0२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The youth murdered at Sinngaon Jahgir