गायखेड येथील युवकाचा धरणात बुडून मृत्यू

By Admin | Updated: April 30, 2017 02:40 IST2017-04-30T02:40:49+5:302017-04-30T02:40:49+5:30

१७ वर्षीय तरुणाचा तलावाच्या गाळामध्ये फसून मृत्यू झाला.

The youth of Gaekheed drowned in the dam | गायखेड येथील युवकाचा धरणात बुडून मृत्यू

गायखेड येथील युवकाचा धरणात बुडून मृत्यू

शारा : लोणार तालुक्यातील गायखेड येथील तलावात गावातील विद्यार्थी पोहण्यासाठी जातात. २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पोहत असताना ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेला प्रेमचंद शेषराव पवार या १७ वर्षीय तरुणाचा तलावाच्या गाळामध्ये फसून मृत्यू झाला.
प्रेमचंद हा त्याची आई व बहीण धुणे धुण्यासाठी गेले होते व गावातील इतर मुले सोबत धरणात पोहत असताना अचानक प्रेमचंद हा गाळामध्ये फसला. तेव्हा त्याच्या आईने, बहिणेने व इतर पोहणार्‍या मुलांनी आवाज दिला. तसेच तो पाण्याच्या बाहेर येत नसल्याने त्यांच्या आईने शेजारच्यांना आवाज देऊन माहिती दिली. त्यावेळी वढव जि.प. सदस्य राजेश मापारी यांनी स्वत:हा तलावामध्ये मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तेजराव घायाळ, माजी शहर प्रमुख शिवसेना अशोक वारे, माजी सरपंच संजय घायाळ, पुरुषोत्तम घायाळ यांनी धरणामध्ये उतरुन मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तीन तासानंतर त्या मुलाचे प्रेत मिळाले. त्याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर तलाठय़ांनी तातडीने जाऊन पंचनामा केला.

Web Title: The youth of Gaekheed drowned in the dam