शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेतील सिमेंट बंधारा चुकीच्या ठिकाणी

By admin | Updated: March 18, 2017 01:05 IST

लघुसिंचन विभागाचा प्रताप; पाणी साठविणे अशक्य, पैशांचा अपव्यय.

नवीन मोदेधामणगाव बढे (जि. बुलडाणा), दि. १७- जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बांधांच्या कामाचा ह्यले-आउटह्ण तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे. शेतकर्‍यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासन जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या योजनेंतर्गत भाग नं.२ मध्ये शेषराव श्यामराव बढे यांचे गट नं.४७३ या शेतानजिक ह्यले-आउटह्ण तांत्रिकदृष्ट्या चुकीचा टाकण्यात आला. यावेळी संबंधित शेतकर्‍यास विश्‍वासात घेण्यात आले नाही. चुकीच्या ह्यले आउटह्ण मुळे पाण्याचा प्रवाहदेखील बदलणार आहे. या सिमेंट बंधार्‍याचे काम मोठय़ा प्रमाणात पूर्ण झाले आहे. बांधकाम झाल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे लघुसिंचन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चुकीच्या ह्यले-आउटह्ण मुळे दोन्ही बाजूच्या शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे लघुसिंचन विभाग आपल्या कामाबाबत किती गंभीर आहे, याची कल्पना येते. पाणी मुरेल की पैसा ?जलयुक्त शिवार योजनेंतर्गत धा.बढे येथील नदीवर कोट्यवधीची कामे सुरु आहे; मात्र ही कामे नियमानुसार होत नाहीत. नफ्यामध्ये सरळ भागीदारी काहींना देण्यात येत असल्याने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ह्यपाणी मुरेल की पैसाह्ण हा प्रश्न जनतेस पडला आहे.या ठिकाणी टाकलेला ह्यले -आउटह्ण तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे. ही बाब संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीदेखील हे मान्य केले; परंतु संबंधित शेतकर्‍यांच्या नुकसानास जबाबदार कोण, हा खरा प्रश्न आहे. - संजय बढेकाँग्रेस कार्यकर्ता, धा.बढे.