शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2017 02:38 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सोनोशी येथील घटना.

सिंदखेडराजा, दि. २४- तालुक्यातील सोनोशी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडवावा व तोपर्यंत दरवर्षीप्रमाणे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा त्वरित सुरु करावा, या मागणीसाठी सोनोशी येथील असंख्य महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समितीवर २४ मार्च रोजी हंडा मोर्चा काढला.तालुक्यातील सोनोशी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी जनता त्रस्त आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या द्वारकाबाई सानप यांचा पाणी काढत असताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. त्यांना जबर मार लागला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने कायमस्वरूपी योजना राबवून दरवर्षीप्रमाणे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी सोनोशी येथील असंख्य महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. या मोर्चामध्ये नागरिकांचासुद्धा मोठा सहभाग होता. मोर्चेकर्‍यांनी पंचायत समितीचे सभापती राजू ठोके व सहायक संवर्ग विकास अधिकारी एम.टी. सुळे यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी व्ही.एन. भाटकर यांची आजच बैठक झाली आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी कायमस्वरूपी निर्णय लवकरच घेऊ.एम.टी. सुळे, बीडीओ, सिंदखेड राजा.