लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : कार व आॅटोची धडक होऊन ३० जानेवारी रोजी झालेल्या अपघातातील जखमी युवतीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.संग्रामपुर तालुक्यातील टूनकी ते बावनबीर रस्त्यादरम्यान आॅटो व कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली होती. हडीयामाल (वसाळी ) येथुन मजुरांना घेवून आॅटो बाावनबीर कडे जात होता. समोरून येणाऱ्या एमएच-२८-२२७६ क्रमांकाच्या कारने अॅटोला धडक दिली होती. त्यात मनी रावजी अहिºया (रा. हडीयामाल, ता . संग्रामपुर) ही युवती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, त्यातच तिचा नंतर मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसानी कार चालका विरोधीत युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तथा मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमानुसार दोन फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली कार सध्या सोनाळा पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रकरणाचा तपास सोनाळा पोलिस करत आहे.
अपघातात जखमी युवतीचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:02 IST