शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले

By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST

निधी अभावी गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम रखडले आहे.

बुलडाणा : देऊळघाटसह सहा गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात यावी, यासाठी शासनाने सन २00९ मध्ये महत्वाकांक्षी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु केवळ निधी अभावी गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम रखडले आहे. परिणामी या गावांना उन्हाच्या चटक्यासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट हे गाव गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या गावात पावसाळय़ातही पाणीटंचाई असते. उन्हातान्हात हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसोदुर पायपिट करावी लागत आहे. त्यामुळे देऊळघाटसह इतर गावांची पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात आणावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर शासनाने १0 कोटी ७८ लाख रुपयाची धाड, बोरखेड, देऊळघाट, चांडोळ, चौथा, गिरडा व करडी या सहा गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी मासरुळ धरणातील १.0७ दलघमी साठा आरक्षीत करण्यात आला आहे. या योजनेला मंजूरात मिळताच या कामाचा ठेका लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नागपूर या कंपनीला देण्यात आला आहे. या योजनेच्या कामासाठी चार वष्रे कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये दोन वष्रे काम पुर्ण करण्यासाठी व दोन वष्रे देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आले होते. परंतु या कामाची निविदा २00९ मध्ये मंजूर करण्यात आल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. शिवाय मुळ योजनेत भाववाढ व पाईप देखभाल खर्च विचारात घेण्यात आला नाही. तसेच या योजनेसाठी रोड परवानगी चाज्रेस, जमीन संपादन, वसाहत, एक्सप्रेस फिडर आदी कामामुळे या योजनेच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी जास्तीचा निधी देण्यात यावा, असा सुधारीत प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. परंतु प्रस्ताव सादर होवून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असतानादेखील अद्याप शासनाने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. परिणामी उपरोक्त सहा गावातील पाईपलाईन, पाण्याची साठवण टाकी, पंप घराचे काम व जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले नाही. तसेच देऊळघाट, चांडोळ, करडी व चौथा येथील पाण्याच्या टाकीचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. परिणामी योजना मंजूर होवूनही सहा गावातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. देऊळघाट सहा गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची गरज आहे.