शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई

By Admin | Updated: April 23, 2017 19:41 IST2017-04-23T19:41:39+5:302017-04-23T19:41:39+5:30

खामगाव- शासकीय कामकाजानिमित्ताने शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी असते. मात्र तालुक्याचे काम पाहणाऱ्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई भासत आहे.

Water related to government offices | शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई

शासकीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई

खामगाव : तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कामकाजानिमित्ताने शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी असते. मात्र तालुक्याचे काम पाहणाऱ्या तालुकास्तरीय कार्यालयांमध्येच पाणीटंचाई भासत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरओ थंड पाण्याची सुविधा आहे. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांना पाणी पिण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी या कार्यालयांमध्ये हजारो रुपये खर्च करुन पाण्याच्या टाकी बांधण्यात आल्या. मात्र संबंधितांच्या दुर्लक्षामुळे त्या कोरड्या झाल्या आहेत.

Web Title: Water related to government offices