शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील जलसाठय़ांमध्ये भरपावसाळ्यात घट

By admin | Updated: August 24, 2014 00:49 IST

आठ दिवसात दोन टक्के जलसाठा झाला कमी; उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट?

अकोला : पश्‍चिम विदर्भातील धरणांमधील जलसाठय़ात भर पावसाळ्यात झपाट्याने घट होत आहे. गत आठ दिवसात जलसाठा दोन टक्कय़ांनी घसरल्याने, आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची भीती भेडसावू लागली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्हय़ांकडे यावर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले असताना, या चार जिल्हय़ांमधील धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणी शिल्लक आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये १५ व २३ जूलै रोजी पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र दमदार पाऊसच झाला नसल्याने धरणांमध्ये आधीच कमी असलेला जलसाठा आणखी घटत चालला आहे. पाऊस तर नाहीच आणि दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पिभवन होत आहे. ऐन पावसाळ्य़ाच्या मध्यावर हे चित्र निर्माण झाल्याने, भविष्यातील पाणी टंचाईच्या कल्पनेने आताच या भागातील नागरिकांच्या अंगावर शहारे येत आहेत. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पात आजमितीस केवळ २0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. या २0 टक्के जीवंत जलसाठय़ात आठ ते दहा टक्के गाळ असल्याने शहरापुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अकोला जिल्हय़ातीलच मोर्णा धरणात ३५ टक्के, निर्गुणात ३१ टक्के व उमा धरणात केवळ १0 टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरणातील जलसाठा तर शून्य टक्के आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड व वाण या प्रकल्पांमध्ये मात्र अनुक्रमे ९0 व ८0 टक्के जलसाठा आहे.

** बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या धरणामध्ये २0.२0 दशलक्ष घनमीटर, म्हणजेच २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिल्ह्यतील ज्ञानगंगा या प्रकल्पात ३८ टक्के, मस धरणामध्ये २६ टक्के, कोराडीत ४५ टक्के, तर पलढग या प्रकल्पात १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा धरणात आजमितीस केवळ १८ टक्के जलासाठा शिल्लक असून, त्या जिल्हय़ातील बोरगाव धरणात १४ टक्के, निम्न पूसमध्ये ४९ टक्के, सायखेडा धरणात ४४ टक्के, गोकी धरणात ४५ टक्के, तर वाघाडी धरणामध्ये ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी या प्रकल्पांची अवस्थाही अशीच आहे.