चौदाव्या वित्त आयोगातील निधी वाटपाला सूचनांची प्रतीक्षा

By Admin | Updated: August 29, 2015 00:28 IST2015-08-29T00:28:49+5:302015-08-29T00:28:49+5:30

बुलडाणा जिल्ह्याला मिळाले २६ कोटी ७६ लाख ; वितरणासाठी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचनाच नाहीत!

Waiting for suggestions for the allocation of funds from the 14th Finance Commission | चौदाव्या वित्त आयोगातील निधी वाटपाला सूचनांची प्रतीक्षा

चौदाव्या वित्त आयोगातील निधी वाटपाला सूचनांची प्रतीक्षा

बुलडाणा : ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींसाठी पहिला टप्प्यात २६ कोटी ७६ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, हा निधी ग्रामपंचायतींना वितरित कसा करावा, याबबात जिल्हा प्रशासनाला सूचना नसल्याने हा निधी पडून आहे. जिल्ह्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत सुमारे २६ कोटी ७६ लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडेच पडून आहे. ग्रामीण विकासासाठी वित्त आयोगाचा निधी उपलब्ध केला जातो. यापूर्वी जिल्हा परिषदेला १0 टक्के व पंचायत समितीला १५ टक्के निधी वित्त आयोगातून दिला जात होता; परंतु यावर्षी १४ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांऐवजी थेट संबंधित ग्रामपंचायतीला दिला जाणार आहे. त्यामुळे जि.प. व पं.स.च्या अधिकाराला कात्री लावण्यात आली आहे. राज्यात पहिल्या हप्त्यात मिळालेल्या ८११ कोटी ६६ लाखांपैकी बुलडाण्याला २६ कोटी ७६ लाख रुपये मिळाले आहेत. निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झाला असला तरी हा निधी नेमका कसा वितरित करायचा, याबाबत मार्गदर्शक सूचना नाहीत. ग्रा.पं.च्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपले खाते अपडेट करावे लागणार आहे.

Web Title: Waiting for suggestions for the allocation of funds from the 14th Finance Commission