‘ब्लड स्टोरेज’ सेंटरची प्रतीक्षा!

By Admin | Updated: October 1, 2015 00:16 IST2015-10-01T00:16:15+5:302015-10-01T00:16:15+5:30

रक्तदान दिन विशेष; वर्षाकाठी बुलडाणा जिल्ह्यात लागते आठ हजार पिशव्या रक्त.

Waiting for 'Blood Storage' Center! | ‘ब्लड स्टोरेज’ सेंटरची प्रतीक्षा!

‘ब्लड स्टोरेज’ सेंटरची प्रतीक्षा!

खामगाव : वर्षाकाठी जिल्ह्यात आपतकालीन परिस्थिती तथा प्रसंगी रुग्णांना देण्यासाठी जवळपास आठ हजार रक्तपिशव्यांची गरज भासते त्यासाठी जिल्ह्यात नव्याने पाच ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटर सुरू करण्यासाठी गेल्या वर्षी माहितीही संकलीत करण्यात आली होती. परंतू अद्याप त्यानुषंगाने कार्यवाही झाली नसल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुत्रांनी स्पष्ट केले. या पाच ब्लड स्टोरेज सेंटरसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मान्यतेसाठी प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मात्र त्यापुढील कार्यवाही झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. सिंदखेड राजा, लोणार, बिबी, मोताळा आणि धाड या गावांच्या ठिकाणी हे ब्लड स्टोरेज सेंटर देण्यात येणार होते. मात्र अनुषंगीक प्रशासकीय कार्यवाही सध्या रखडली आहे. १३ तालुक्यांच्या बुलडाणा जिल्ह्याचा विस्तार मोठा असून असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी या सेंटर्सची जिल्ह्यात गरज आहे. जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५00 छोटे मोठे अपघात होता. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर जीवीतहानी होण्यासोबतच अनेकांना अपंगत्व येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यानुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्ह्यातील अंतर्गत भागात अवघ्या दीड तासात रक्तपुरवठा करता येणे शक्य आहे. सध्या जिल्ह्यात चिखली, मेहकर, देऊळगाव मही, मलकापूर असे चार ठिकाणी ब्लड स्टोरेज सेंटर आहे. मात्र नव्याने प्रस्तावीत ब्लड स्टोरेज सेंटर कार्यान्वीत झाल्या जिल्ह्यात नऊ ब्लड स्टोरेज सेंटर्स होतील. परंतु त्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ, पॅथॉलॉजी,स्टोरेजसाठी दहा बाय दहाची रुम, बीटीओ, तंत्रज्ञ आणि वाताणूकुलीत यंत्रणेची गरज भासणार आहे.

Web Title: Waiting for 'Blood Storage' Center!