शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग, दररोजचे १५० कॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 11:58 IST

Waiting for 108 ambulance : शहरी तथा ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेसाठी दररोजचे १५० च्या आसपास कॉल्स येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  कोरोना संसर्गाची व्याप्ती सातत्याने वाढत असून आता रुग्णवाहिकेसाठीही वेटिंगवर राहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याउपरही जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ११ हजार १२१ रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्याचे दिव्य १०८ रुग्णवाहिकेने पार पाडले आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुकास्तरावरून डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये तथा खासगी किवीड रुग्णालयामध्ये गंभीर रुग्णांना दाखल करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शहरी तथा ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेसाठी दररोजचे १५० च्या आसपास कॉल्स येत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील जवळपास ४६ रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत. वर्तमान स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या ५५ हजारांच्या घरात गेली असून सक्रिय रुग्णांची संख्या ७,५०० च्या टप्प्यात आली आहे. त्या तुलनेत रुग्णालयात उपलब्ध बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड कन्फर्म झाल्याशिवाय रुग्णांना घेण्यास जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनाही अडचण भेडसावत आहे. रुग्णवाहिकेसाठी शहरी तथा ग्रामीण भागातून दररोजचे १५० कॉल्स येतात. यातील ८० टक्के कॉल्स हे तालुकास्तरावरून असतात. ग्रामीण भागातून २० टक्के कॉल्स येत असल्याचे चित्र आहे. कोरोनाव्यतिरिक्तही अन्य रुग्णांनाही सेवा द्यावी लागत असल्याने जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचेही शेड्युलही सध्या टाइट झाले आहे. त्यातच जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या ही २३ असून या संपूर्ण रुग्णावाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ५ कार्डियाक रुग्णवाहिकाही आहेत. मध्यंतरी रूग्णवाहिकांना प्राणवायुबाबत अडचण आली हाेती. मात्र ती आता दूर झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस