शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा- नळगंगा नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी दूर

By admin | Updated: March 23, 2017 02:36 IST

मुख्यमंत्र्याचा पुढाकार तुपकरांना जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

सुधीर चेके पाटीलचिखली (बुलडाणा), दि. २२- सुमारे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार्‍या वैनगंगा-नळगंगा या नदीजोड प्रकल्पातील प्राथमिक अडचणी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने दूर झाल्या आहेत. या योजनेचा सविस्तर अहवाल मार्च अखेरीस पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्राधान्य दिल्या जाणार असल्याचे आश्‍वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांना दिले आहे.प्रस्तूत नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यास आत्महत्याग्रस्त विदर्भातील या जिल्हय़ांमध्ये भरभराट येईल. बुलडाणा व अकोला या अवर्षणप्रवण जिल्हय़ातील खारपाणपट्यात तसेच जिगाव प्रकल्पाचे लाभक्षेत्र सोडून घाटाखालील अधिकाधिक गावांना पाणी मिळू शकेल. विदर्भातील प्रस्तावित औष्णिक विद्युत प्रकल्पांनाही पाणी उपलब्ध होऊन या भागाची विजेची मागणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून विदर्भासाठी नवसंजीवनी ठरणार्‍या या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुषंगाने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना याबाबत उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाजन यांनी तुपकर यांना याबाबत लेखी खुलासा पाठविला आहे. यामध्ये राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्युडीए) मार्फत वैनगंगा-नळगंगा योजनेचा अभ्यास सुरू असून १९१२ दलघमी पाणी वापराकरीता राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने जुलै २0१५ मध्ये योजनेचा व्यवहार्यता अहवाल नव्याने तयार केला आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मार्च २0१७ पर्यंंत पूर्ण करण्याचे नियोजित असून वळण कालव्याचे सर्वेक्षण १८९.५ किमी वर्धा नदीपर्यंंत पूर्ण करण्यात आले आहे. भूगर्भीय व भूतांत्रीक अन्वेषणाअंतर्गत ९४ किमी भागाचे ह्यमॅपींगह्ण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरण अन्वेषण विभाग नागपूर, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ नागपूर व अमरावती यांच्या मार्फत संयुक्तरित्या नदीजोड कालव्याची संरेख, साठा स्थळे व लाभक्षेत्र आदी बाबी ठरविण्यात येत असून राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडून वैनगंगा-नळगंगा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर शासन स्तरावरून यास मान्यता प्राप्त झाल्यावर प्रकल्पास प्राधान्य देवून केंद्र शासनाचा निधी या योजनेकरीता प्राप्त करण्यास्तव प्रयत्न करण्यात येतील, असेही जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांनी या लेखी कळविले आहे. प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याकडे नेण्याचा घातला होता घाट नदीजोड प्रकल्पाची उपयोगीता व गरज लोकमतमध्ये वृत्तमालीकेतून उजेडात आणल्यानंतर रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रकल्पाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा व विदर्भाचे पाणी मराठवाड्याला वळविण्याचा प्रयत्न हाणून पाडावा, अशी मागणी केली होती.या प्रकल्पातून बुलडाणा आणि अकोला जिल्हा वगळून यवतमाळमार्गे हिंगोली, जालना, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड या जिल्हय़ांना पाणी वळते करण्याचे प्रयत्न मध्यतंरी सुरू होते. मात्र, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पाबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने मुख्यमंत्र्यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांना याबाबत उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.