शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : भाजीपाल्यासारखी केली वन्यपक्ष्यांची विक्री

By admin | Updated: January 7, 2017 19:39 IST

नीलेश शहाकार , ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. ७ -  पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा नारा दिला जात असतानाच शहरात बºयाच ...

नीलेश शहाकार , ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ७ -  पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा नारा दिला जात असतानाच शहरात बºयाच ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीररित्या खुलेआम तितर, बटेर(लावरी) या वन्यपक्षांची मांसाहारासाठी विक्री होत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. जिल्ह्यात वनक्षेत्राचा मोठा भाग असलेल्यामुळे या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हीच बाब लक्षात घेऊन या वन्यपक्ष्यांना पकडण्याचे आणि त्यांची विक्री करण्याचा 'उद्योग' शहरात सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या पक्ष्यांची शहरातील संगमचौक, जयस्तंभ चौक परिसरात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील या मुख्य चौकात सकाळी साधारण सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास वन्यपक्षी विक्रेता दोन महिलांचा वावर होता. त्याच्याकडे प्रत्येकी १० वन्यपक्षी होते. नियमित ग्राहकांनी या महिलांशी संपर्क साधून आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी या वन्यपक्षांची खरेदी केली. हा व्यवसाय कायद धाब्यावर शहरात खुलेआम सुरु असून स्थानिक वनविभागाचे दुर्लक्ष आहे. हे विशेष.
 
असा ठरतो भाव..
ग्राहक जवळ आला की, सदर महिलेनी आपल्या झोळीतून या वन्यपक्षांची जोड काढून दाखवायची साधारणत: ५०० रुपये जोडीपासून भावबाजी सुरु होते. तितेर २०० ते २२० रुपये जोडी, बटेर (लावरी) १६० ते १८० रुपये जोडी विकली गेली. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पौष्टीक मांसाहाराची मागणी पुर्ण करण्यासाठी या छोट्या वन्यपक्ष्यांनाला लक्ष्य केले जाते.
 
अशाप्रकारे होते विक्री 
 
१-स्थानिक संगम चौकात सदर पक्षी विक्री करतांना महिला आढळून आली.
२-प्रतिनिधीने या महिलेशी संपर्क साधून तीच्याकडील बटेर (लावरी) खरेदी
करण्याबाबत भावबाजी केली.
३-यानंतर १५० रुपये जोडी नुसार भाव निश्चित करुन तीन बटेर(लावरी) खरेदी
करण्यात आली.
४- विकत घेतलेल्या तीन लाव-या नजिकच्या वनक्षेत्रात सोडण्यात आल्या.

 

https://www.dailymotion.com/video/x844nk4