शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यापासून वाहनांच्या रांगा!

By admin | Updated: March 24, 2017 01:28 IST

बारदानाच उपलब्ध नसल्याकारणाने देऊळगावराजा तालुक्यातील नाफेड केंद्रावरील तूर खरेदी ठप्प.

अर्जूनकुमार आंधळे देऊळगावराजा, दि. २३- देऊळगावराजा तालुक्यातील ५९ गावांत यावर्षी शेतकर्‍यांनी मोठय़ा अपेक्षेने तुरीच्या पिकांची लागवड केली. उत्पादनही चांगले निघाले. नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात झाली; मात्र नियोजनाचा अभाव आणि बारदानाच उपलब्ध नसल्याकारणाने सगळेच नाफेड केंद्रावरील तूर खरेदी ठप्प झाली आहे.जवळपास एक महिन्यापासून वाहनांच्या रांगा नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर लागल्या असून, मापच होत नाही. परिणामी, शेकडो वाहने उभीच आहेत. तूर खरेदी केंद्रावर हमाल आणि काट्यांची आवश्यकतेनुसार उपलब्धता नाही. त्याच बरोबर बारदाना नसल्याने तूर खरेदीचा काटाच बंद असल्याचे चित्र देऊळगावराजा येथे गुरुवारी दिसून आले. बाजार समितीच्या माहितीनुसार आतापर्यंत ६६ क्विंटल तुरीची खरेदी झाल्याचे सांगितले. हरभरा २५ क्विंटल, गहू ३५ क्विंटल इतकी आवक आली आहे. हमाल व काट्यांच्या तसेच बारदाण्याच्याअभावी तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. प्रत्येक शेतकर्‍याजवळ वाहने नसल्याने तूर विक्रीसाठी आणताना मोठा त्रास होत आहे. जी वाहने ट्रॅक्टर, मेटॅडोर यातून नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर आणल्या गेली. ती वाहने एक महिन्यापासून रांगेत उभी असल्याने तोही आर्थिक भुर्दंड शेतकर्‍यांना सोसावा लागत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाफेडने तूर खरेदी सुरु करण्यापूर्वीच येणार्‍या अडचणींचे नियोजन करणे आवश्यक होते; मात्र तसे न झाल्याने याचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. तुरीची खरेदी सुरु होईल, या आशेवर शेतकरी आहेत. नेमकी खरेदी पुन्हा कधी सुरु होणार, याबद्दल मोठी शंका निर्माण झाली आहे. जेवढी गरज आहे, तेवढे मुबलक हमाल व काटे कधी उपलब्ध होणार बारदाना कधी येणार, हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.

तालुक्यात यावर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. अजून बरेच शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी येणे बाकी आहे. नाफेडने बारदाना व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन खरेदीला सुरुवात करावी. जोपर्यंंत सर्व शेतकर्‍यांचा पूर्ण माल विक्रीसाठी येत नाही तोपर्यंत नाफेडने खरेदी सुरु ठेवावी.-भगवान मुंड, संचालक बाजार समिती, दे.राजा.एक महिन्यापासून ट्रॅक्टर रांगेत उभा आहे. कधी हमाल नाही, काटे कमी आहेत. बारदाना संपला हे उत्तरे ऐकून शेतकरी आता थकलेत आता तर तुरीची खरेदी पण बंद झाली. - सचिन काकडपिंपळगाव बु., शेतकरी