वेदी प्रतिष्ठा महोत्सव देऊळघाट येथे उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:26+5:302021-07-07T04:42:26+5:30

रविवारी देऊळघाट येथील पार्श्वनाथ भगवान जैन मंदिराच्या सहाशे वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या निमित्ताने हा ...

Vedi Prestige Festival in excitement at Deulghat | वेदी प्रतिष्ठा महोत्सव देऊळघाट येथे उत्साहात

वेदी प्रतिष्ठा महोत्सव देऊळघाट येथे उत्साहात

रविवारी देऊळघाट येथील पार्श्वनाथ भगवान जैन मंदिराच्या सहाशे वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या निमित्ताने हा वेदी शिलान्यास महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आचार्य श्री आर्यनंदी महाराज यांच्या प्रेरणेने, आचार्य विद्यासागरजी महाराज कल्पवृक्ष नंदीजी महाराज, अमित सागर महाराज व विशेष सागर महाराज यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विधान आचार्य म्हणून राजेश रोकडे, खामगाव यांनी पूजन केले. सकाळपासून मांगलिक कार्यक्रम घटयात्रा, ध्वजारोहण श्रावक अल्पोपाहार, विधान प्रारंभ, वेदी शिलान्यास व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संगीतकार रवींद्र वायकर यांनी काम पाहिले. सकल दिगंबर जैन समाज देऊळघाट व भादोला यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर राखून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Web Title: Vedi Prestige Festival in excitement at Deulghat