शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भागात घरकुल योजनेला घरघर

By admin | Updated: November 9, 2014 23:56 IST

रमाई घरकुल योजना : बुलडाणा जिल्ह्यात केवळ २३ टक्केच उद्दिष्ट पूर्ण.

सिद्धार्थ आराख /बुलडाणा ग्रामीण भागापाठोपाठ शहरी भागातही रमाई घरकुल योजनेला घरघर लागली आहे. बुलडाणा जिल्ह्याला ३५१ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र चार वर्षात १५२ घरे पूर्ण करण्यात आले. म्हणजे जिल्ह्यात केवळ २३ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे शहरी भागातही रमाई आवास घरकुल योजना राबविली जाते. या योजनेला सामाजिक न्याय विभाग निधी उपलब्ध करून देते. तर नगरपालिका एजन्सी म्हणून काम करते. मागील सन २0११ ते २0१४ या चार वर्षात बुलडाणा जिल्ह्यातील काही निवडक नगरपालिकांना रमाई घरकुल आवास योजनेचे ३५१ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी ३ कोटी १0 लाख ५0 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून देण्यात आली होती; मात्र पालिकांनी चार वर्षात केवळ १५२ घरे बांधली. सन २0१0-११ आणि २0११- १२ या दोन वर्षात १७१ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावर ३ कोटी ५0 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. पैकी या दोन वर्षात १५२ घरेच पूर्ण करण्यात आली. निवड झालेल्या १७१ लाभार्थ्यांना १ कोटी ६८ लाख रुपये वाटप करण्यात आले. हे उद्दिष्ट केवळ २३ टक्के एवढेच आहे. सन २0१३-१४ मध्ये १८0 घराचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र या दोन वर्षात एकही घर पूर्ण झाले नसल्याचे सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या अहवालात म्हटले आहे. म्हणजे सन २0१२-१३ आणि १३-१४ या दोन वर्षातील १८0 घरे आणि सन २0१0-११ आणि ११-१२ या दोन वर्षातील अपूर्ण ५५ घरे असे २३५ घरे नगरपालिकांनी बांधली नाहीत. त्यामुळे २ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. तर २३५ लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहिले. *पालिकांनी निधी वळविलानगरपालिकांमध्ये असलेला राजकीय हस्तक्षेप आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे रमाई घरकुल योजनेसाठी आलेला निधी अनेक नगरपालिकांनी इतर विकास कामाकडे वळता केल्याने शासनाच्या या योजनेला खीळ बसली आहे. दुसरीकडे सदर योजनेची कामे करून घेण्यास सामाजिक न्याय विभागाही कमी पडला. त्यामुळे शासनाच्या या चांगल्या योजनेपासून लाभा र्थी वंचित राहिले.*निधी आहे; पण लाभार्थी वंचित लोणार येथील दारिद्रय़रेषेखालील घटकांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी पाच वर्षांपासून घरकुलां पासून वंचित आहेत. या योजनेंतर्गत न.प.ला प्राप्त निधी पडून आहे. सन २0१0-११ आणि २0११-१२ मध्ये शहरातील दारिद्रय़रेषेखालील घटकांसाठी रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा, याकरिता न.प.कडून १0 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. न.प.कडून पाठविलेले हे प्रस्ताव मंजूर करून घरकुलाच्या बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी नगरपालिकेला प्राप्तही झाला. मंजूर दहा प्रस्तावांपैकी ७ लाभार्थी हे सरोवरापासून ५00 आणि पुरातन वास्तूपासून १00 मीटरच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास आहे. त्यामुळे घरकुल मंजूर होऊनही हे लाभार्थी घरकुलांपासून वंचित आहेत.