शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

सुक्ष्म सिंचन अनुदानापासून दोन हजार शेतकरी वंचित

By admin | Updated: November 23, 2014 00:01 IST

बुलडाणा तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित; सुक्ष्म सिंचन योजनाचे २ कोटी ८४ लाख ६९ हजाराचे अनुदान रखडले.

धाड (बुलडाणा): सततच्या अस्मानी संकटाने होरपळलेल्या, शे तकर्‍यांना, सुलतानी संकटाने हवालदिल केले असून शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याऐवजी ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचा प्रत्यय बुलडाणा तालुक्यात येत असून कृषी विभागातर्फे वाटप होणार्‍या सुक्ष्म सिंचन योजनेचे २ कोटी ८४ लाख ६९ हजाराचे अनुदान सन २0१२ पासून रखडले आहे. सदरचे अनुदान अद्यापपर्यंंंत शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने बुलडाणा तालुक्यातील १ हजार ९२८ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.शासनाचे काम बारा महिने थांब ही ग्रामीण भागातील म्हण सार्थ ठरवत, उलट गेल्या २४ महिन्यापासून शेतकर्‍यांचे शासकीय अनुदान लालफीतशाहीत अडकून पडले आहे. सततच्या दुष्काळाने शेतकरी हैराण आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल जात आहे. आगामी काळात सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार म्हणून पाण्याची बचत होऊन कृषी उत्पन्न हाती येण्यासाठी शासनाने विदर्भ सधन सिंचन योजना सुरू केली, त्याअंतर्गत ठिबक संच व तुषार संच खरेदीवर शेतकर्‍यांना क्षेत्राप्रमाणे ५0 टक्के ते ७५ टक्के अनुदानाची सोय करुन दिली.गेल्या २0१२ पासून बुलडाणा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आजवर १५८0 हेक्टरवर, ठिबक आणि तुषार सिंचन संच बसवून घेतले व त्याकरिता आवश्यक असणारी सर्व रक्कम शेतकर्‍यांनी कर्जाऊ घेऊन भरणा केली. मुळात तात्काळ स्वरुपात शेतकर्‍यांना त्यांचे अनुदान थेट त्यांचे बँक खात्यात जमा होणे आवश्यक असताना केवळ शासनाच्या दप्तर दिरंगाईने अजुनही शेतकर्‍यांना त्यांचे अनुदान प्राप्त झालेले नाही.बुलडाणा तालुक्यात ठिबक संचाचे एकूण २५१ शेतकर्‍यांचे अनुदान प्रस्ताव तर तुषार संचाचे एकूण १६७७ शेतकर्‍यांचे अनुदान प्रस्ताव २0१२ पासून कृषी विभाग बुलडाणा यांचेकडे प्रलंबित आहेत.कृषी अधिकारी कार्यालयातर्फे वरीष्ठ पातळीवर अनुदानाची मागणी केली आहे. मात्र अजुनही निधी प्राप्त नाही. निधी आल्यास शेतकर्‍यांना अनुदान वाटप होणार असल्याची माहीती कृषी अधिकारी बी.टी. हिवाळे यांनी दिली.