खामगावातील साईभक्तांवर काळाचा घाला, शिर्डी दर्शनासाठी जाताना अपघातात 2 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 13:28 IST2018-03-02T13:28:46+5:302018-03-02T13:28:46+5:30

शिर्डी येथे दर्शनासाठी जात असताना तरुणांच्या वाहनाला मालेगाव-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर  2 जण जखमी झालेत.

Two people died in an accident while going to Shirdi Darshana | खामगावातील साईभक्तांवर काळाचा घाला, शिर्डी दर्शनासाठी जाताना अपघातात 2 जणांचा मृत्यू 

खामगावातील साईभक्तांवर काळाचा घाला, शिर्डी दर्शनासाठी जाताना अपघातात 2 जणांचा मृत्यू 

खामगाव - शिर्डी येथे दर्शनासाठी जात असताना तरुणांच्या वाहनाला मालेगाव-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर  2 जण जखमी झालेत. शुक्रवारी (2 मार्च) सकाळी कुंदलगाव शिवारात  ही दुर्घटना घडली आहे. विशाल पेशवनी आणि हर्षद चंदानी अशी मृतांची नावं आहेत तर लखन व सनी पेशनवी हे दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. 

खामगाव येथील नॅशनल हायस्कूल जवळील सिंधी कॉलनीतील 4 जण आपल्या मारुती- सुझुकी (क्रमांक एम एच २८- ए एन ४७५१ ) कारनं शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांच्या कारचा मालेगाव- शिर्डी महामार्गावर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेदा झाला व दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  या दुदैवी घटनेमुळे खामगाव येथील सिंधी कॉलनीत शोककळा पसरली आहे.

कसा झाला अपघात?
कारचं टायर अचानक फुटल्यानं कार उलटून भीषण अपघात झाला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला दोन जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर जखमींना तातडीनं मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


 

Web Title: Two people died in an accident while going to Shirdi Darshana