शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन ठार; तीन गंभीर

By admin | Updated: June 10, 2017 01:56 IST

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/चिखली : जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. चिखली व सिंदखेड राजा तालुक्यात वीज पडून दोन ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. चिखली तालुकाभरात ९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात वीज पडून एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे घडली आहे. या घटनेतील जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसर्‍या घटनेत साखरखेर्डा येथील सलीम खान सुभान खान यांचा देखील वीज कोसळून मृत्यू झाला.तालुक्यात सर्वत्र सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसादरम्यान तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील नीलेश अंकुश जाधव (वय २१) व सागर मच्छिंद्र जाधव (वय २१) हे दोघे मित्र घरापासून साधारणत: २00 मीटर अंतरावर लघुशंकेसाठी गेले होते. तेथून घराकडे परतत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना नीलेश अंकुश जाधव या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेतील गंभीर जखमी सागर जाधव याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साखरखेर्डा येथे वीज पडून एक ठार, दोन जखमी साखरखेर्डा : येथील इनाम शिवारात ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वीज पडून, तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, तिन्ही जखमींना तातडीने बुलडाणा येथे उ पचारार्थ हलविण्यात आले आहे. साखरखेर्डा येथील सलीम खान सुभान खान हे पत्नीसह शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शुक्रवारला सायंकाळी ४ वाजता वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट होत असताना वीज पडली. त्यामध्ये सलीम खान सुभान खान (६0) यांचा मृत्यू झाला असून, शहीदाबी नवाब खान (५0) आणि सानियाबी जमिर खान (९) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.