वाहनचालकाकडून वाहतूक शाखेच्या हातावर तुरी

By Admin | Updated: May 22, 2014 23:40 IST2014-05-22T22:54:37+5:302014-05-22T23:40:06+5:30

पोलिसांचे दुर्लक्ष : वाहनांवरील ‘पोलिस’ व ‘प्रेस’चा गैरफायदा

Turned on the traffic branch of the driver | वाहनचालकाकडून वाहतूक शाखेच्या हातावर तुरी

वाहनचालकाकडून वाहतूक शाखेच्या हातावर तुरी

मेहकर: वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांवर ह्यपोलीसह्ण व ह्यप्रेसह्ण लिहून गैरफायदा घेतल्या जात आहे. पोलीस किंवा प्रेसच्या खात्याचा कुठलाही संबंध नसतांना स्वत:च्या वाहनावर पोलीस किंवा प्रेस अशाप्रकारचे ब्रीद टाकून वाहतूक शाखेच्या हातावर तुरी दिल्या जात आहेत. शहरात व तालुक्यातील अनेक भागात कोणीही आपल्या वाहनांवर प्रेस तर काही वाहनांवर पोलीस असे लिहून वाहने सुसाट धावत आहेत. प्रेस व पोलीस लिहिलेल्या वाहनाचा गैरवापर करुन त्यातून अवैध प्रवाशी वाहतूक तसेच बेकायदेशीर धंद्यासाठी या वाहनाचा वापर होतांना दिसत आहे. पोलीस विभागातही काही कर्मचारी आपल्या दुचाकी वाहनाच्या नंबर प्लेटवर नंबर न टाकण्याऐवजी ह्यपोलीसह्ण लिहून फिरतांना दिसत आहेत. यातील काही जणांचा तर पोलीस खात्याशी कवडीचा संबंध नसतो. तरीसुद्ध वाहनावर पोलीस लिहून गैरवापर करीत आहेत. यासंदर्भात आर.टी.ओ.विभागाच्या हालचाली सुरु असून काही ठिकाणी तर चौकशीचे आदेशही देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांवर ह्यप्रेसह्ण लिहिण्याची सर्रास पद्धत असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. प्रेस लिहिलेल्या दुचाकी वाहनांवर तीन प्रवाशी बसवून पोलीसांच्या नाकावर टिच्चून डोळ्यादेखत निघून जातात. ज्यांचा त्या खात्याशी कुठलाही संबंध नसतांना पोलीस, प्रेस, त्याचबरोबर नंबर प्लेटवर राजमुद्राचा लोगो, वेगवेगळ्या प्रकारचे सायरन वाहनांवर सर्रास पाहायला मिळत आहेत. अशा गाड्यांना रोखणे गरजेचे झाले आहे. जे खरे पत्रकार असतात ते आपल्या वाहनांवर प्रेस लिहत नाहीत. मात्र पत्रकारीतेशी काडीचाही संबंध नसणारे अवैध धंदे करणारे प्रेस आदी लिहून त्या वाहनाचा गैरवापर करीत असल्याचे दिसून ेयेते. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यासंदर्भात गंभीरतेने लक्ष घालून पोलीस व प्रेस लिहून गैरवापर करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Turned on the traffic branch of the driver