वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:34+5:302021-07-16T04:24:34+5:30

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पाऊस होत आहे. वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे ...

Turn off the mobile as soon as the power goes out; Stay away from trees! | वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

वीज कडाडताच मोबाइल करा बंद; झाडांपासून राहा दूर!

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र पाऊस होत आहे. वीज ही सामान्यत: उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही; परंतु काही स्थाने इतर ठि‍काणांपेक्षा सुरक्षित असतात. जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो. वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो.

वीज पडण्यापूर्वी चेतावणीचे चिन्ह...

वीज पडण्यापूर्वी काही चेतावणीची चिन्हे आपत्तीव्यवस्थापन विभागाकडून देण्यात आलेली आहेत. अतिवेगाने वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंगावणारे गडगडाटी वादळ, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना, ही सर्व वादळासह विजेच्या चेतावणीची चिन्हे आहेत.

बाहेर पडलेल्या व्यक्तीचेच

वज्राघातामुळे नुकसान

सामान्यत: बाहेर पडलेल्या व्यक्तीचेच वज्राघातामुळे नुकसान होते. बाहेर असलेल्या व्यक्ती वज्राघातामुळे जखमी होतात किंवा मृत्यू पावतात. त्यामुळे आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थि‍तीत वैद्यकीय सेवेसंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू आणि वातानुकूलित यंत्रे बंद ठेवण्यात यावीत. विजा चमकत असताना व घराबाहेर असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावेत. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे. गडगडाटासह वादळ आल्यास उंच जागांवर, मोकळ्या जागा, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टाॅवर्स, दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी टाळावे. घरात असल्यास विद्युत उपकरणे विद्युत जोडणीस हात लावू नये, अशी माहिती आवाहन आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा किती?

बुलडाणा जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा आहेत. त्यातील काही यंत्रणा कार्यान्वित आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात किनगाव राजा, सोनाळा व इतर दोन ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

वीज पडण्याची माहिती होण्यासाठी आयआयटीएमकडून दामिनी नावाचे ॲप विकसित करण्यात येत आहे.

Web Title: Turn off the mobile as soon as the power goes out; Stay away from trees!