ट्रकची एसटी बसला धडक; अपघातात १२ प्रवासी जखमी तर 5 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:54 PM2022-08-01T12:54:25+5:302022-08-01T12:55:40+5:30

अंजनी बु येथील घटना : पाच प्रवासी गंभीर

Truck hits ST bus; 12 passengers were injured in the accident, 5 seriously | ट्रकची एसटी बसला धडक; अपघातात १२ प्रवासी जखमी तर 5 गंभीर

ट्रकची एसटी बसला धडक; अपघातात १२ प्रवासी जखमी तर 5 गंभीर

googlenewsNext

मेहकर/डोणगाव (बुलडाणा) : भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिल्याने १२ प्रवाशी जखमी झाले़ यापैकी पाच जण गंभीर झाले़ ही घटना मेहकर तालुक्यातील अंजनी बु जवळ १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. नागपूर-औरगांबाद बस क्र. एमएच २० बीएल ३३१४ ही औरंगाबादवरून नागपूरकडे जात होती. 

दरम्यान, अंजनी बु येथे डोणगाववरून मेहकरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने या बसला धडक दिली. यामध्ये बसमधील १२ प्रवाशी जखमी झाले आहे़ यातील पाच जण गंभीर आहेत. ही धडक एवढी भीषण होती की बसच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. याबाबत, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले़. जखमींवर सध्या मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Read in English

Web Title: Truck hits ST bus; 12 passengers were injured in the accident, 5 seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.