शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड योजनेतील वृक्ष सुकले!

By admin | Updated: April 15, 2017 01:11 IST

संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष: सामाजिक संस्था, वृक्षप्रेमींनी फिरवली पाठ!

नीलेश शहाकार - बुलडाणाशासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करीत गतवर्षी १ जुलै रोजी वन महोत्सव साजरा करत शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात आली; मात्र त्यानंतर वृक्ष संवर्धनाकडे प्रशासनासह सहभागी सामाजिक संघटनांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने उन्हाळ्याच्या प्रारंभीच हे वृक्ष सुकले आहेत. पर्यावरण धोका निर्माण होत असल्यामुळे १ ते १५ जुलै २०१६ दरम्यान वन महोत्सव साजरा करून २ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच पंधरा दिवसात शहर आणि ग्रामीण स्तरावर ३ लाख ४६२ वृक्ष लागवड करण्यात उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र मोठा गाजावाजा करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन प्रशासन व सामाजिक संघटनांना करता आले नाही. शेवटी वृक्षारोपण अभियान केवळ प्रसिद्धीपुरतेच मर्यादित राहिले. आज वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ खड्डेच शिल्लक राहिले आहे, तर हजारो रुपये खर्च करून लावण्यात आलेले लोखंडी ट्रिगार्ड केवळ वृक्ष सुकल्याने रिकामे असल्याचे दृष्टीस पडत आहे. वृक्ष अडकले अतिक्रमणातशहरातील मलकापूर-औरंगाबाद मार्गावर वन महोत्सवादरम्यान तब्बल १०० वृक्षांचे रोप करण्यात आले. त्यावेळी स्थानिक नगरपालिकेकडून या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा होता; मात्र आज या मार्गावर लघू व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे या मार्गावर लावण्यात आलेले वृक्ष व त्यांचे ट्रि गार्ड अतिक्रमणात गडप झाले आहेत.वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार?बुलडाणा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे सामाजिक दायित्व अनेक संस्थांनी नेहमीच जोपासले आहे. यातून शहरातील विविध मार्गांवरील दुभाजक व परिसरातील वृक्षांना पाणी देण्याचे काम दररोज सायंकाळी बुलडाणा अर्बन संस्था व नगर परिषदेकडून करण्यात येत होते. सुरुवातीला शहरातील वृक्ष टवटवीत दिसायची; मात्र नवीन वर्षात नगर परिषदेमध्ये सत्ता बदल झाला. आता शहरातील दुभाजकावर वृक्षाऐवजी मोकाट कुत्रे बसलेली आढळून येत आहेत. या कारणामुळे शहरातील वृक्ष संवर्धनाचे दायित्व कोण घेणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.