शीतपेयातून दोघांना विषबाधा

By Admin | Updated: January 19, 2015 01:10 IST2015-01-19T01:10:43+5:302015-01-19T01:10:43+5:30

बुलडाणा येथील घटना.

Toxic poisoning | शीतपेयातून दोघांना विषबाधा

शीतपेयातून दोघांना विषबाधा

बुलडाणा : मुदतबाह्य शीतपेयाच्या सेवनानंतर दोन युवकांना विषबाधा झाली. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी ३ च्या सुमारास बुलडाणा-मलकापूर मार्गातील एका हॉटेलमध्ये घडली. बुलडाणा शहरात आयोजित विवाह समारंभात जेवण आटोपल्यानंतर काही युवक मलकापूर मार्गावरील हॉटेल माउली येथे गेले. तेथे शीतपेयाच्या सेवनानंतर शे. इरफान शे. इब्राहिम आणि शे.रिजवान शे. युसूफ या दोन युवकांना ओकार्‍या झाल्या. या प्रकारानंतर त्यांच्यासोबत असलेल्या मोहसीन खान यांनी शीतपेयाची बॉटल तपासली असता, त्यावरील एक्सपायरी डेट निघून गेल्याचे आढळून आले. ही बाब हॉटेलमालक दीपक गाडेकर यांच्या लक्षात त्यांनी आणून दिली तसेच शहर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली. सदर प्रकरण अन्न व औषध विभागाकडे येत असल्यामुळे या प्रकरणी हाच विभाग चौकशी करेल, असे ठाणेदार एन. पी. तांदळे यांनी याप्रकरणी सांगितले.

Web Title: Toxic poisoning