शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

तुरीने अडवला पीआरसीचा दौरा

By admin | Updated: April 30, 2017 03:15 IST

३ मे रोजीच्या बैठकीत ठरणार दौर्‍याची तारीख.

अकोला : जिल्हा परिषदेतील कारभाराचा धांडोळा घेणार्‍या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा दुसर्‍यांदा पुढे ढकलला आहे. समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौर्‍यात बदल होत आहे, असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात तुरीच्या प्रश्नावरून उठलेल्या गदारोळात समितीला रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दौरा टाळलेलाच बरा, असा सल्ला स्थानिक राजकारण्यांनी दिल्याने दौरा पुढे ढकलल्याची चर्चा आहे. पंचायत राज समितीचा यापूर्वी अकोला जिल्हा परिषदेत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दौरा निश्‍चित झाला होता. त्यावेळी अकोला महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान २३ रोजी मतमोजणीचा कार्यक्रम ठरल्याने दौरा पुढे ढकलण्यात आला होता, तसेच दौरा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित करण्याचेही सांगण्यात आले होते. त्यानंतर हा दौरा थेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ३ ते ५ मे दरम्यान ठरला. आता तो पुन्हा पुढे ढकलला आहे.स्थानिक राजकारण्यांचा दबावराज्यात सर्वत्र तुरीच्या खरेदीमुळे शासन अडचणीत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी काहीही करू शकतात, असा शासनाचा अंदाज आहे. अकोला जिल्हय़ातही तुरीच्या मुद्यावरून शेतकरी संतप्त आहेत. त्यातच समितीचा दौरा ग्रामीण भागातही होणार आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी काय होईल, याचा नेम नाही. त्यासाठी समितीने सध्या दौरा टाळलेलाच बरा, असा दबावासकट आग्रह स्थानिक राजकारण्यांनी धरला. परिणामी, दौरा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.