शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संतनगरीत आज श्रींचा पुण्यतिथी महोत्सव

By admin | Updated: August 29, 2014 23:50 IST

उत्सवानिमित्त ६५0 भजनी दिंड्यांचे शेगावात आगमन.

गजानन कलोरे /शेगाव संतनगरी शेगावात श्री गजानन महाराजांचा १0४ वा पुण्यतिथी महोत्सव भाद्रपद शु.५ शनिवारी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी ७ ते ९ हभप कव्हळेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवात सुरू करण्यात आलेल्या यज्ञाची पूर्णाहुती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे. दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा गज अश्‍वासह नगर परिक्रमा निघणार आहे. रविवार ३१ ला सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहांडी, गोपाळकाला या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने संतनगरीत सर्वत्र हरिनामाच्या गजराचे गंजण होत आहे. उत्सवाकरिता लगतच्या परिसर व जिल्हय़ातून ६५0 चेवर भजनी दिंड्यांचे आगमन होऊन श्री चरणी श्रद्धा अर्पित करून महाप्रसाद घेऊन आपआपल्या गावी परतत आहेत. आतापावेतो ४ ते ५ भजनी दिंड्या मुक्कामी थांबलेल्या आहेत. त्या दिंड्यांना संस्थानकडून मंडपाकरिता सहयोग राशीसुद्धा देण्यात येत आहे. तसेच संस्थानकडून मुक्कामी भजनी दिंड्यांना जागा, लाईट, पाणी आदीचे सहकार्यसुद्धा देण्यात येत आहे. आलेल्या भजनी दिंड्यांना महाप्रसाद, संस्थानच्या नियमांची पूर्तता केलेल्या दिंड्यांना भजनी साहित्य, माउली पताका, अंशदान भजनी साहित्य दुरुस्तीकरिता व दवाखाना अशी सुविधा देण्यात येत आहे. संत गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सवानिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.