बुलडाण्यात आज विद्रोही साहित्य संमेलन

By Admin | Updated: January 17, 2015 00:14 IST2015-01-17T00:14:34+5:302015-01-17T00:14:34+5:30

आंबेडकरी विचारवंत जयंतभाई परमार यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

Today's insurgent literature meeting in Buldhana | बुलडाण्यात आज विद्रोही साहित्य संमेलन

बुलडाण्यात आज विद्रोही साहित्य संमेलन

बुलडाणा : येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणातील ताराबाई शिंदे साहित्यनगरीत १३ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उर्दू, गुजराती कवी, आंबेडकरी विचारवंत जयंतभाई परमार यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे.
प्रारंभी सकाळी ९ वाजता ताराबाई शिंदे यांच्या वाड्यावरून समता दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा होईल. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीराम गुंधेकर, प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष डॉ.डी.एम. अंभोरे, डॉ.अरूण शेळके, मुख्य निमंत्रक अँड. जयश्री शेळके विचारमंचावर उपस्थित राहतील, यावेळी ह्यविद्रोही दिशाह्ण या स्मरणिका व इतर ग्रंथांचे प्रकाशन होईल.
दुपारी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा के.ओ. बावस्कर आणि शाहीर डी.आर. इंगळे सादर करतील. २ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांचे ह्यसंतांची क्रांतिकारकताह्ण, या विषयावर व्याख्यान होणार आहे. आजच्या मुख्य कार्यक्रमानंतर दुपारी ३ वाजता ह्यधर्मांतर बंदी कायदा कुणाला वायदा, कुणाला फायदाह्ण, या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद होणार आहे.
या परिसंवादामध्ये करणसिंग कोकणी नंदुरबार, डॉ. प्रवीण बन्सोडे अमरावती, डॉ. ईसादास भडके चंद्रपूर, डॉ. बशारत अहमद उस्मानाबाद, संध्या दरे-पवार मुंबई आणि डॉ. उमेश बगाडे औरंगाबाद हे सहभाग घेणार आहेत. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर शिखरे हे राहणार असून, सूत्रसंचालन प्रशांत सोनुने तर आभार कमलेश खिल्लारे करणार आहेत.

Web Title: Today's insurgent literature meeting in Buldhana