शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात आज निवडणूक

By admin | Updated: September 21, 2014 00:44 IST

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची उद्या, २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती या संवर्गासाठी राखीव असून, जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचा अध्यक्ष होणे जवळपास निश्‍चित आहे. काँग्रेसकडे अलका चित्रांगण खंडारे या एकमेव जि.प.सदस्य या प्रवर्गातील असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड होण्याच्या घोषणाच बाकी आहे. तर उपाध्यक्षपदासाठी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीचे जि.प.सदस्यांशी चर्चा केली. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात १0 जि.प.सदस्य संख्या असून, यात राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाराकाँ ३, अपक्ष, सेना आणि मनसे असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसच्या माया चव्हाण या एकमेव महिला सभापती आहेत. तर मतदारसंघात मलकापूर पांग्रा, सोनुशी-वर्दडी, सिनगाव जहागीर, मेरा खु. ही चार जि.प.सर्कल राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यात दिनकरराव देशमुख, अरुणा मधुकर गव्हाड, शारदा रमेश दंदाले आणि पांडुरंग खेडेकर हे जि.प.सदस्य आहेत. चालू टर्ममध्ये एकाही सदस्याला जि.प.मध्ये सभापतीपद मिळाले नव्हते, त्यामुळे एक उपाध्यक्ष आणि एक सभापती पद मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रथम उपाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्या जात आहे. जि.प. निवडणुकीत दिनकरराव देशमुख यांनी मलकापूर पांग्रा जि.प.सर्कलमधून सर्वाधिक ९५00 म ताधिक्य मिळविले होते. तर दुसरे मेरा खु. जि.प.सर्कलमधील पांडुरंग खेडेकर हेही प्रबळ दावेदार आहेत. मागील टर्ममध्ये एकही पद राकॉंला न मिळाल्याने यावेळी उपाध्यक्ष पद या मतदार संघात कसे मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली जात असल्याचे दिसत आहे.