शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

By admin | Updated: April 15, 2017 00:39 IST

सिंदखेडराजा/मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे.

सिंदखेडराजा येथून प्रारंभ; शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक अधिक आक्रमक

सिंदखेडराजा/मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून प्रारंभ होऊन ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, १८ एप्रिल रोजी शहापूर येथे दुसऱ्या टप्प्याचा समारोप होईल.भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी आयोजित ही यात्रा राष्ट्रमाता मॉ जिजाऊ जन्मभूमीच्या पवित्र शहरामधुन सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा निघत आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राकाँ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंढे, माजी मंत्री पतंगराव कदम, पिरिपाचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, मनोहर नाईक, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, माणिकराव ठाकरे, भाष्कर जाधव, शेकापचे जयंत पाटील, सपाचे प्रदेश अध्यक्ष अबु आझमी, माजी मंत्री अब्दुल सत्तार, वामनराव चटप, आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम नियोजनाची पाहणी राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवाजी राजे जाधव, मधुकर गव्हाड, राजुआप्पा बोंद्रे, जगन सहाने, जगन ठाकरे, अ‍ॅड. संदीप मेहेत्रे, भगवानराव सातपुते, डॉ. बुरकुल, राम राठोड, महेश पवार, विजय जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राकाँचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी केले आहे.