खामगावातील तीन दारु दुकानमालकांना हवे स्थलांतरण

By Admin | Updated: April 14, 2017 13:40 IST2017-04-14T13:40:17+5:302017-04-14T13:40:17+5:30

शहरातील तीन दारु दुकानमालकांनी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारु दुकान स्थलांतरणाची मागणी केली आहे.

Three shorts of Khamgawa shoppers need to migrate | खामगावातील तीन दारु दुकानमालकांना हवे स्थलांतरण

खामगावातील तीन दारु दुकानमालकांना हवे स्थलांतरण

खामगाव: न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारु दुकाने बंद झाल्याने शहरातील एक दुकान वगळता सर्वच दारु दुकाने बंद झाली आहेत. दरम्यान शहरातील तीन दारु दुकानमालकांनी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारु दुकान स्थलांतरणाची मागणी केली आहे. यामध्ये चिखली बासपासवरील अशोका वाईनबार, चौधरी बिअरशॉपी, वऱ्हाडे बिअरशॉपी या दुकान मालकांचा समावेश असून या संदर्भात अद्याप राज्या उत्पादन शुल्क विभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

Web Title: Three shorts of Khamgawa shoppers need to migrate