शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-आघाडी नगरसेवकांचा साडेतीन तास ठिय्या

By admin | Updated: April 18, 2017 22:36 IST

खामगाव- काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले.

सर्वसाधारण सभेतील ठरावाच्या प्रती देण्याची मागणीखामगाव : येथील नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेच्या ठरावांच्या प्रती देण्यात टाळाटाळ करण्यासोबतच, काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले यांना पालिकेत तात्कळत ठेवल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सायंकाळी काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांच्या कृतीसह पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणाचा निषेधही यावेळी करण्यात आला. खामगाव नगर पालिकेत २८ फेब्रुवारी सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत पारीत सर्व ठरावांच्या प्रती, सभेच्या मिनिटस् बुकच्या प्रती तसेच सभेची कार्यवृत्त प्रस्तिकेची प्रत मिळावी, यामागणीसाठी काँग्रेस नगरसेवक तसेच काँग्रेसच्या गटनेत्या सौ. अर्चना टाले यांनी ६ मार्च, १४ मार्च, १६ मार्च आणि २० मार्च रोजी तसेच १८ एप्रिल रोजी देखील पत्र देण्यात आले. मात्र, या ठरावाच्या प्रती उपलब्ध करून न देता, गटनेत्या अर्चना टाले यांना मंगळवारी तात्कळत ठेवण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान, काँग्रेस नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना विचारणा केली. सोबतच २८ फेब्रुवारीच्या सभेच्या ठरावांच्या प्रतींची मागणी केली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज संपल्याचे सांगत, कार्यालय सोडले. मुख्याधिकाऱ्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी साडेपाच वाजतापासून सव्वा आठ वाजेपर्यंत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधाऱ्यांचाही निषेध करण्यात आला.या आंदोलनात काँग्रेस गटनेत्या सौ. अर्चना टाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख, अमय सानंदा, प्रवीण कदम, भारिपचे नगरसेवक विजय वानखडे, शीतल माळवंदे, भूषण शिंदे, इब्राहिम खान, रेहाना बेगम, संगीता पाटील, अ. रशीद यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता, त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाखामगाव पालिकेतील या घटनाक्रमाचा पाढा काँग्रेस नेते तथा माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी साडेसात वाजता जिल्हाधिकाऱ्यांकडे वाचला. मुख्याधिकाऱ्यांसोबतच खामगाव पालिकेतील सत्ताधाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे भ्रमण दूरध्वनीवरून तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री आंदोलन करण्याऐवजी बुधवारी सकाळी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आपले ग्राहाणे मांडण्याच्या सूचना केल्या. काँग्रेसनेते सानंदा यांनी पालिकेतील आंदोलन थांबविण्याचा निरोप पालिकेत दिला. त्यानंतर काँग्रेस-आघाडीच्या नगरसेवकांनी सव्वा आठ वाजता मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील आंदोलन थांबविले.