शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठे तहानलेलेच !

By admin | Updated: August 19, 2015 01:48 IST

सिंदखेडराजा तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे ढग कायमच.

अशोक इंगळे /सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प पावसाअभावी कोरडे पडले असून, सर्वांनाच दमदार पावसाची गरज आहे. तब्बल अडीच महिने लोटूनही नदी, नाले वाहिले नाही. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे ढग कायम आहेत. चार गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून, काही गावे भीषण पाणी टंचाईच्या कचाट्यात येत आहेत.साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात यावर्षी सुरुवातीपासून पावसाने उघडझाप सुरु ठेवली. खरीप हंगामातील पिकं या पावसाने जगत असली तरी फुलं आणि फळधारणेत आलेल्या पिकाला पावसाची नितांत गरज आहे. रिमझिम पावसावर पिके तग धरुन आहेत; परंतु धरणे, तलाव यासाठी दमदार पावसाची गरज आहे. साखरखेर्डा भागात १५0 मिमीपर्यंत पाऊस पडला असून, गायखेडी तलाव, महालक्ष्मी तलाव, राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, सावंगी माळी - १ आणि - २ या तलावात कोठेही पाणीसाठा नाही. शेंदुर्जन मंडळात जागदरी तलावात मृतसाठा शिल्लक असून, हनवतखेड, हिवरा गडलिंग येथील दोन्ही मध्यम प्रकल्प कोरडी पडली आहेत. त्यामुळे मलकापूर पांग्रा आणि दरेगाव या दोन्ही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. मलकापूर पांग्रा मंडळात १00.00 मिमीसुद्धा पाऊस पडला नसल्याने सर्वच छोटी तलाव कोरडी आहेत. दुसरबीड मंडळात १८0.00 मिमी पाऊस पडला असला तरी केशव शिवणी, मांडवा, जऊळका तलावात फक्त मृतसाठा असून, १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे. सोनोशी मंडळात २00 मिमी पाऊस झाला. या परिसरात जांभोरा, ताडशिवणी, रुम्हणा, सोनोशी, बुट्टा तांडा, विझोरा, चांगेफळ यासह २५ गावाचा पाणीपुरवठा विद्रुपा धरणावरून होतो; परंतु मराठवाड्यात आजपर्यंत कोठेही दमदार पाऊस न पडल्याने पाणी टंचाईचे संकट आले. किनगावराजा मंडळातही परिस्थिती फारशी चांगली नाही. सिंदखेडराजा परिसरातही पाहिजे तसा पाऊस नाही. त्यामुळे चांदणी तलाव, मोती तलाव कोरडेच आहेत. ज्या गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या उमरद, सोनोशी, मलकापूर पांग्रा, पिंपळखुटा, दरेगाव, केशव शिवणी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १२ गावात विहीर अधिग्रहण आहे. काही गावात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडण्यात येते. साखरखेर्डा, सिंदखेडराजा येथे महिन्यातून एकवेळा पाणीपुरवठा होतो. तर साखरखेर्डा येथे गढूळ पाणी पाणीपुरवठा होत असून, ६-६ महिने पाण्याची टाकी स्वच्छ केल्या जात नाही. त्यामुळे मिळेल त्या पाण्यावर जनतेला दिवस काढण्याची वेळ आली आहे.