शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिकस्त इमारतींबाबत गांभीर्य नाही

By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST

खामगाव शहरात किती जीर्ण इमारती व घरे आहेत याबाबत पालिकेकडे ठोस स्वरूपात माहितीच उपलब्ध नाही.

खामगाव : शहरात किती जीर्ण इमारती व घरे आहेत याबाबत पालिकेकडे ठोस स्वरूपात माहितीच उपलब्ध नाही. पालिकेने याबाबत कर्मचारी कमी असल्याची सबब देत सर्व्हे देखील केलेला नाही. केवळ सार्वजनिक स्वरूपात नोटीसवजा आवाहन करून वेळ मारून नेली जात आहे. वैयक्तिक स्वरूपाच्या नोटिसा कधी दिल्या जातील याबाबत संभ्रमावस्था आहे. तोपयर्ंत पावसाळा सुरू होऊन जाईल याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे.शहरातील पडक्या इमारतींचे मालक तसेच नाल्याकाठी अतिक्रमण करून राहणार्‍या घरांचे सर्वेक्षण पालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने वैयक्तिक नोटिसा अद्यापही अशा घरमालकांना दिलेल्या नसल्यामुळे त्याबाबतची कार्यवाही थंड बस्त्यात आहे. पावसाळ्यात विशेषत: संततधार पावसात कच्ची अर्थात मातीची घरे तसेच जीर्ण झालेल्या इमारती पडण्याची भीती असते. अशामुळे नाहक काही जणांना अपघातालाही सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता अशा इमारती खाली करून त्या दुरुस्त करून घ्याव्या किंवा पाडून टाकाव्या याबाबत पालिकेतर्फे आवाहन केले जाते. परंतु सर्वेक्षण करून वैयक्तिक नोटिसा देण्याबाबत टाळाटाळ केले जाते. यंदादेखील पालिकेने अद्यापही अशा इमारतींचे सर्वेक्षण केलेले नाही.