शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

योगिताच्या उपचाराकरिता दानशुरांनी पुढे येण्याची गरज

By admin | Updated: April 17, 2017 01:09 IST

संग्रामपूर- उरळ ते मोरझाडी रस्त्यावर दुचाकीत ओढणी अडकल्याने २१ वर्षीय योगिता अपघातात जबर जखमी झाली. मेंदुला मार लागल्याने ती कोमात असून, अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकमत मदतीचा हातसंग्रामपूर : तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील अत्यल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीवर उपचारासाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन आपद्ग्रस्त शेतकऱ्याकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील रहिवासी गजानन झाडोकार यांची २१ वर्षीय मुलगी दुचाकीने जात असताना उरळ ते मोरझाडी रस्त्यावर दुचाकीत ओढणी अडकल्याने ५ एप्रिल रोजी झालेल्या अपघातात जबर जखमी झाली. या अपघातात तिच्या मेंदुला मार लागल्याने ती कोमात असून, तिच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत तिच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून, तिच्या उपचाराकरिता वडिलांना दोन लाख रुपये खर्च आतापर्यंत आला आहे. तिच्या वडिलांकडे एक एकर कोरडवाहू शेत असून, आतापर्यंत शेतातील सर्व उत्पन्नाचा पैसा व नातेवाईकांकडून उसनवार घेऊन तिच्यावर उपचार केले आहेत. दरम्यान, १५ एप्रिल रोजी योगीताला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र आता नातेवाईकांकडून घेतलेली उसनवार व जवळचा सर्वच पैसा उपचाराकरिता लागल्याने पुढील उपचाराकरिता आर्थिक मदतीची गरज आहे. योगिताच्या वडिलांकडे एकच एकर शेती असल्यामुळे ते मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचा एक मुलगा प्रवीण यांचे १२ वी चे शिक्षण सुरू आहे, तर दुसरा मुलगा वैभव यांचे ११ वीचे शिक्षण सुरू आहे. योगिताचे शिक्षण या गरीब कुटुंबातून बी.ए. द्वितीय वर्षापर्यंत झाले आहे. उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यास दानशुरांनी पुढे यावे. याकरिता गजानन रामकृष्ण झाडोकार यांच्या सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या पातुर्डा शाखेच्या खाते क्रमांक २९६९५४१४९० आयएफसी कोड नं.२८१७२४ मध्ये मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन झाडोकार परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. लग्नाआधी घडला अपघातजखमी असलेल्या योगिता गजानन झाडोकार हिचे लग्न १७ एप्रिल रोजी ठरले होते. त्यामुळे योगिता ५ एप्रिल रोजी पातुर्डा खुर्द येथून मोरझाडी येथे चुलतमावशीच्या गावी जेवणासाठी बोलविल्याने जात होती. दरम्यान, उरळ गावाजवळून मोरझाडी येथे जात असताना तिची ओढणी दुचाकीत अडकून अपघात झाला.