शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

म्हसला येथे तीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 01:10 IST

अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

धाड(जि. बुलडाणा), दि. २३- धाडपासून साधारण: ५ कि.मी. अंतरावर असलेल्या बुलडाणा तालुक्यातील म्हसला खु. या गावात कालरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी जबर घरफोडी करुन साधारण तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची घटना घडली.म्हसला खु. येथील देवराव लक्ष्मण तायडे या शेतकर्‍याचे घराचे समोरच्या दरवाजातून प्रवेश मिळवत मागील घरात असणार्‍या लोखंडी कपाट व लोखंडी पेट्यामधून नगदी रोख ६४ हजार व सोन्याच्या बांगड्या, गहूपोत, चांदीचे दागिने व अंगठी, असा एकूण दोन लाख रु. पेक्षा अधिक मालमत्ता चोरट्यांनी लंपास केली.देवराव तायडे यांनी मागीलवर्षी घराचे बांधकाम केले यासाठी त्यांनी हातउसने पैसे घेतले होते. ते परत करण्यासाठी सोयाबीन, मका, हरभरा विकून पैसा घरी ठेवला होता. मात्र २२ रोजी रात्री चोरट्यांनी घरातील मालमत्तेवर हातसाफ करुन शेतकर्‍याची दैना केली आहे. तर त्यांचे घरानजीक काही अंतरावर अशोक रामभाऊ तायडे यांचे घरातही चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश मिळवत घरातील २५ हजार रु. रोख रक्कम, चांदीचे कडे व दागिने, असा साधारण एक लाखापेक्षा अधिक ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याठिकाणी दोनही घरातील लोखंडी पेट्या व कोठी ह्या चोरट्यांनी उचलून नेऊन नदीमध्ये टाकल्या होत्या, तर अशोक तायडे यांचा मुलगा श्रीकृष्ण तायडे यांचा मोबाइल फोनही चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे या दोनही घरात एवढी चोरीची घटना घडली तेव्हा घरातील सर्व सदस्य घरात झोपून होते, अशा स्थितीत चोरीची घटना घडली. या चोरीची घटनेत चोरट्यांनी बेशुद्धीचे औषधी वा स्प्रे यांचा वापर केला असावा. जेणेकरुन घरातील कुठलाही सदस्य उठला नाही.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला तर पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी यांनी घटनास्थळ पाहणी करुन तपासाचे निर्देश दिले. या घटनेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार सुनील जाधव व त्यांचे सहकारी करत आहेत. चोरीच्या घटनेने धाड परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.