शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ अपात्र शिक्षकांच्या वेतनाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:11 IST

प्राथमिक शिक्षण विभागाकडून टीईटी अपात्र शिक्षकांचे वेतन सध्या थांबविण्यात आलेले आहे.

- ब्रह्मानंद जाधवबुलडाणा: ‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्यासंदर्भात अमरावती विभागामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. अमरावती विभागातील बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाकडून टीईटी अपात्र शिक्षकांचे वेतन सध्या थांबविण्यात आलेले आहे. तर इतर जिल्ह्यात वेतन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील टीईटी अपात्र शिक्षकांवर सध्या अन्याय होत आहे.प्राथमिक शिक्षकांकरीता (इयत्ता पहिली ते आठवी) शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील टीईटी नसलेल्या शिक्षकांचे १ जानेवारी २०२० पासून वेतन थांबविण्याच्या सुचना बुलडाणा येथील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०१३ नंतर ६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या अनुदानित, विनाअनुदानित यासह सर्व माध्यमाच्या शाळांवरील प्राथमिक शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण नसलेल्याने वेतन थांबविण्यात आले आहेत. अमरावती, यवतमाळ, भंडारा, नागपूर, जालना, जळगाव, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे ह्या सर्व ठिकाणच्या टीईटी अपात्र शिक्षकाचे वेतन सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातीलच शिक्षकांवर अन्याय का? असा प्रश्न टीईटी अपात्र शिक्षकांकडून उपस्थित होत आहे. १ जानेवारी २०२० पासून जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याबाबत आल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी खान यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.माध्यमिकच्या शिक्षकांचे वेतन सुरूपाचवी ते आठवीपर्यंतच्या काही शाळांचे वेतन हे माध्यमिक शिक्षण विभागाकडून केले जाते. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाकडून टीईटी अपात्र शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले; मात्र माध्यमिक शिक्षण विभागाकडून येणाºया शिक्षकांचे वेतन सुरू आहे.जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन सुरळीत सुरू आहे. वेतन थांबविण्या संदर्भात कुठलाही आदेश नाही.-डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणिकारी बुलडाणा.बुलडाणा वगळता इतर ठिकाणी टीईटी पात्र नसलेल्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन सुरू करण्यात यावे, यासाठी वरिष्ठांशी बोलणे झाले आहे. लवकरच या शिक्षकांचाही प्रश्न सुटेल.-संगीता शिंदे, अध्यक्ष, शिक्षण संघर्ष संघटना, अमरावती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक