शिक्षकाने केला महिला कर्मचा-याचा विनयभंग

By Admin | Updated: April 2, 2015 01:56 IST2015-04-02T01:56:19+5:302015-04-02T01:56:19+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील प्रकार.

Teacher molested by female employee | शिक्षकाने केला महिला कर्मचा-याचा विनयभंग

शिक्षकाने केला महिला कर्मचा-याचा विनयभंग

धाड (जि. बुलडाणा): स्थानिक मौलाना आझाद उर्दू ज्युनिआर कॉलेज व डी.एड् कॉलेजवर कार्यरत असणार्‍या एका शिक्षकाने शाळेतील चपराशी म्हणून कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना आज १ एप्रिल रोजी उघडकीस आली.
धाड येथील मौलाना आझाद उर्दू ज्युनिआर कॉलेज व डी.एड् कॉलेजमध्ये आरोपी म.जहीर अ.शब्बीर हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर या ठिकाणी कॉलेजवर च पराशी म्हणून २५ वर्षीय विवाहीत महिला कामावर आहे. यासंदर्भात पीडित महिलेने धाड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, चपराशी महिला ही आपल्या पती व मुलाबाळासह शाळेच्या एका खोलीत वास्तव्याला आहे. या ठिकाणी कार्यरत शिक्षक आरोपी म.जहीर याने गेल्या काही महिन्यापासून पीडितेचा पती घरी नसल्याचे पाहून ईल हावभाव करणे, तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला; मात्र पीडिताने त्यास नकार दिला. तरीही त्याने त्रास देणे सुरुच ठेवले. दरम्यान, ३0 मार्च रोजी सकाळी आरोपी म.जहीर हा पीडित महिलेच्या घरी गेला. त्या ठिकाणी पती नसल्याचे पाहून शिक्षकाने तिचा विनयभंग केला.
या घटनेची माहिती पीडित महिलेने आपल्या पतीस सांगितली. आणि सदर घटनेची तक्रार धाड पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी आरोपी शिक्षक म.जहीर अ.शब्बीर याच्या विरुद्ध भादंविच्या ३५४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर पोलीस हे.काँ.राजेश वानखेडे व उत्तम सिरसाठ करीत आहेत. घटनेनंतर आरोपी शिक्षक हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Teacher molested by female employee